Mp Imtiaz Jalil, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

शिवसेनेत भाजपला रोखण्याची ताकद नाही, त्यांना काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्या लागतात..

शिवसेनेचा जर आमची ताकद कायम आहे असा दावा असेल तर त्यांनी भाजपच्या विरुद्ध एकट्याने लढण्याची घोषणा करावी. (Mp Imtiaz Jalil)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिवसेनेची राज्यात आता पुर्वी सारखी ताकद राहिलेली नाही. ते एकट्याने भाजपचा मुकाबला करून त्यांना हरवू शकत नाही. (Aimim) म्हणूनच त्यांना राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या दोन पक्षांच्या कुबड्यांची गरज भासते, असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी लगावला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव एमआयएमने दिल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये गेल्या चोवीस तासांपासून खल सुरू आहे. (Shivsena) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एमआयएमला तुम्ही भाजप विरोधी आहात हे कृतीतून सिद्ध करा, असे आवाहन दिले, तर त्यांच्याच पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मात्र या प्रस्तावाचे स्वागत केले आहे.

तिकडे काॅंग्रेसने आमच्याकडे प्रस्ताव आला तर विचार करू, अशी भूमिका घेत तळ्यात-मळ्यातची भूमिका स्वीकारली. तर शिवसेना मात्र या प्रस्तावावर चांगलीच भडकली आहे. आज दुसऱ्या दिवशीही यावरून राजकीय कलगितुरा रंगला आहे. एमआयएमला महाविकास आघाडीत घेण्याच्या प्रस्तावावर संतापलेल्या शिवसेनेला खासदार इम्तियाज जलील यांनी आज पुन्हा सुनावले.

शिवसेनेच्या राज्यातील ताकदीवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. प्रसार माध्यमांशी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्यांशी समोरासमोर बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, शिवसेनेची राज्यात आता पुर्वी सारखी ताकद राहिलेली नाही. भाजपला ते एकट्याने पराभूत करू शकत नाही याची जाणीव झाल्यामुळेच त्यांना राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या दोन पक्षांच्या कुबड्यांची गरज लागते आहे.

शिवसेनेचा जर आमची ताकद कायम आहे असा दावा असेल तर त्यांनी भाजपच्या विरुद्ध एकट्याने लढण्याची घोषणा करावी, पण ते असं करू शकत नाहीत. भाजपला पराभूत करायचे असेलत तर तीन पायांच्या रिक्षाला एमआयएमचे चौथे चाक जोडून सगळे मिळून भाजपला रोखू असा प्रस्ताव मी दिला होता.

त्यावरून आम्हाला राष्ट्रवादी, काॅंग्रेस हे दोन्ही पक्ष तुम्ही धर्मनिरपेक्ष आहात हे सिद्ध करायला सांगत आहेत. माझा त्यांना सवाल आहे, राज्यात जेव्हा तुम्ही शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन केली, तेव्हा त्यांना धर्मनिरपेक्षतेचे सर्टिफिकेट मागितले होते का? असेही इम्तियाज जलील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT