शिवसेना भवनाबाहेर बॉम्बस्फोट घडवणाऱ्या मलिकांनाच उद्धव ठाकरे वाचवताहेत

Shivsena| Hinduttv| Nawab malik| गेल्या महिन्यात २३ फेब्रुवारी रोजी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली.
Shweta mahale
Shweta mahale

बुलढाणा: 'ज्या नबाव मलिक (Nawab Malik) मुंबईत बॉम्ब स्फोट घडवून आणले आहेत तसेच शिवसेना भवनात बॉम्ब स्फोट घडवून आणले अशा नवाब मालिकांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.' अशी टीका बुलढाण्याच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी केली शिवसेनेवर (Shivsena) कडाडून टीका केली आहे.

ज्या दिवशी शिवसेना काँग्रेस (Congress) सोबत सत्तेत बसले त्याच दिवशी यांनी हिंदुत्वाला लाथ मारली आहे, त्यांचं हिंदुत्व म्हणजे ढोंगीपणाच आहे, जे हिंदुत्व घेऊन बाळासाहेब ठाकरे लढले ते हिंदुंत्व आताचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विसरले आहेत. त्यामुळे उद्या एमआयएम यांच्यासोबत आली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. खर हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत निघून गेले, असे टोलाही त्यांनी लगावला आहे.

Shweta mahale
घोळ संपेना! मुख्यमंत्रिपदाचे दावेदार दिल्लीत अन् केंद्रीय निरीक्षक राज्यात आमदारांकडे

दरम्यान, गेल्या महिन्यात २३ फेब्रुवारी रोजी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकरशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर करण्यात आला आहे. नबाव मलिक (Nawab Malik) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मलिक यांनी त्यांच्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने मलिक यांना दणका देत त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.

ईडीने अटक केल्याच्या विरोधात मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीची कारवाई चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला होता. हे प्रकरण 22 वर्षांपूर्वीचे असल्याचेही त्यांनी म्हटले होते. न्यायालयाने मलिक यांची ही याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मलिक हे न्यायालयीन कोठडीत असून, त्यांना आता सुटकेसाठी रीतसर जामिनासाठी अर्ज करावा लागेल.

मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले, असा दावा करत हे 'टेरर फंडिंग` असल्याचा आरोपी ईडीने केला आहे. ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर मलिक यांनी `नही झुकेंगे और भी लढेंगे, सबको एक्सपोज कर देंगे` अशी प्रतिक्रिया दिली होती. मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे. तर महाविकास आघाडी सरकारने मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com