Atul Save  Sarkarnama
मराठवाडा

Atul Save News: 'माझ्या भावाला, पुतण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न...'; मंत्री अतुल सावेंनी सगळा घटनाक्रमच सांगितला

Chhatrapati Sambhajinagar News: राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांचे मोठे बंधू आणि पुतण्याला पैठण तालुक्यातील बिडकीजवळील एका गावात शेतातील रस्त्याच्या वादातून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांचे मोठे बंधू आणि पुतण्याला पैठण तालुक्यातील बिडकीजवळील एका गावात शेतातील रस्त्याच्या वादातून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. थेट मंत्र्‍यांच्या भावाला आणि पुतण्याला मारहाण झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

अतुल सावे या हल्ल्याने व्यथित झाले असून माझ्या भावाला व पुतण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राॅडने माझ्या पुतण्याला मारण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून तो आयसीयूमध्ये आहे. मारहाण करणारे लोक हे गुंड प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे आदेशच अतुल सावे यांनी पोलीस अधीक्षक व महानिरीक्षकांना दिले आहेत.

पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाणे हद्दीतील नायगाव खंडेवाडी येथे दुपारी ही मारहाणीची घटना घडली. सावे यांचे ज्येष्ठ बंधू अजित सावे, पुतण्या अमेय सावे यांना गाडी अडवून मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये पुतण्या अमेय गंभीर जखमी झाला आहे. तर अजित सावे यांनाही दुखापत झाली आहे.

अमेय अजित सावे (वय ३५) आणि अजित मोरेश्वर सावे यांना मारहाण झाल्याचे समजताच अतुल सावे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत या गावगुंडावर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बिडकीनच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार घेतल्यानंतर अजित सावे, अमेय सावे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे.

गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी माझ्या भावाला व पुतण्याला बेदम मारहाण केली आहे. माझ्या पुतण्याची प्रकृती चिंताजनक आहे. पुतण्या आणि भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे. माझ्या पुतण्याचा खंडेवाडीमध्ये काँक्रीट प्लांट आहे. दोन वर्षांपासून तो प्लांट त्या ठिकाणी सुरू आहे. व्यवस्थितपणे काम सुरू असताना आज अचानक काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गाडीतून येत माझे बंधू आणि पुतण्याला मारहाण केली.

'इथून गाडी घेऊन जाऊ नका, असे म्हणत त्यांनी दोघांना विरोध केला. रस्त्याचा काही विषय असेल तर त्यावर आपण बोलू असे माझ्या भावाने त्यांना सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊ, तुम्हाला हवे असेल तर मोजणी करू, असेही त्यांनी सांगीतले. मात्र त्या लोकांनी काही ऐकून न घेता माझ्या भावाला धक्काबुक्की केली.

पुतण्या जेव्हा त्यांना समजावायला गेला तेव्हा त्याला थेट मारहाण सुरू केली. रॉडने आणि हातातील कड्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली. माझ्या भावाच्या खिशातील पैसेही हल्लेखोरांनी हिसकावून घेतले, असे अतुल सावे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT