Central Minister Dr. Karad Sarkarnama
मराठवाडा

अपघातात जखमी झालेल्या लहान मुलावर अर्थ राज्यमंत्री डाॅ.कराड यांनी केले उपचार

(Central State Finance Minister Dr. Karad) डॉक्टर म्हणून जखमींना योग्य ती शुश्रूषा मिळावी म्हणून आपल्या गाडीतून जखमींना रुग्णालयात घेऊन गेलो. माझी सर्वांना एकच विनंती आहे वाहने जपून चालावा

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः पेशाने डाॅक्टर असलेले देशाचे अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्यातील डाॅक्टर आणि माणूसकीचे दर्शन आज घडले. राजकारणात गेल्यानंतर आपला मुळ पेशा विसरून पुर्णपणे राजकारणाला वाहून घेतलेले नेते, पुढारी आपण नेहमीच बघतो. पण आपल्या डोळ्यासमोर एखादा अपघात, प्रसंग घडला तर तात्काळ त्याठिकाणी आपल्यातील डाॅक्टर किंवा माणुसकी जागी होणे याला अधिक महत्व असते.

असाच काहीसा प्रकार भाजपचे राज्यसभेतील खासदार व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या बाबतीत घडला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक संपवून परतत असतांना समोरच एक रिक्षा उलटल्याचे कराड यांनी पाहिले. या रिक्षातील साधरणता १० ते १२ वर्षांचा एक मुलगा जखमी झाला होता. त्याच्या तोंडातून रक्तस्त्राव होत होता. हे पाहताच डाॅ. कराड गाडीतून उतरले आणि तातडीने त्या अपघातग्रस्त रिक्षाच्या दिशेने धावले. जखमी मुलाला त्यांनी आधी बाजूला घेतले.

खिशातील रूमाल काढून त्यांच्या तोंडाला लावला, रक्तस्त्राव कमी झाल्यावर त्यामुलाची जागेवरच तपासणी केली. मार किती लागला, दातांची स्थिती काय आहे? तोंडाला गंभीर इजा आहे का? हे अगदी बारकाईने पाहिले आणि त्या मुलाला प्राथमिक उपचार केल्यानंतर आपल्याच गाडीतून दवाखान्यात घेऊन गेले. कराड यांच्यातील डाॅक्टर आणि त्याही पेक्षा जागृक माणुसकीचे दर्शन या निमित्ताने घडले.

अनेकदा रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना आपल्या गाडीतून दवाखान्यापर्यंत पोहचवणे, किंवा तात्काळ जागेवर औषधोपचार, अॅम्ब्यूलन्स बोलवून जखमींना तातडीने हाॅस्पीटलमध्ये हलवण्यास मदत करतांनाची अनेक उदाहरणं आहेत. अगदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, डाॅ. प्रीतम मुंडे, राज्यमंत्री बच्चू कडू अशी अनेक नावे या निमित्ताने समोर येतात.

भाजपचे राज्य उपाध्यक्ष, औरंगाबादचे महापौर, उपमहापौर आणि आता थेट राज्यसभेवर निवडण आणि केंद्रात अर्थ खात्याचे राज्यमंत्री असा स्वप्नवत प्रवास राहिलले भागवत कराड हे मराठवाड्यातील पहिले बालशल्यचिकित्सक म्हणून ओळखले जातात. लहान मुंलावर गुंतागुंतीच्या शस्त्र्क्रिया करण्यात त्यांच्या हातखंडा आहे. त्यामुळे अपघात किंवा त्यात लहान मुल जखमी झाले असेल, तर डाॅक्टर शांत कसे बसू शकतील हे त्यांच्या आजच्या कृतीतून दिसून आले.

कलेक्टर ऑफिस येथून जात असतांना एक ऑटो रिक्षा पलटी झाली. मी ताबडतोब गाडी थांबवून जखमींची विचारपूस केली. त्यात २ लहान मुले देखील जखमी झाल्याचे लक्षात आले. खिशातील रुमाल काढून रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. एक डॉक्टर म्हणून जखमींना योग्य ती शुश्रूषा मिळावी या करीता आपल्या गाडीतून जखमींना रुग्णालयात घेऊन गेलो.

माझी सर्वांना एकच विनंती आहे वाहने जपून चालावा व कुठलाही अपघात आपल्या समोर झाल्यास जखमींची मदत करा, असे आवाहन देखील डाॅ. कराड यांनी या निमित्ताने केले. मी केलेली ही छोटीशी मदत डाॅक्टर व व्यक्ती म्हणून माझी नैतिक जबाबदारीच आहे, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT