Ambadas Danve- Sanjay Shirsat News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat : मराठी माणूस पुढे गेलेला बघवत नाही; 'व्हिट्स'प्रकरणात आरोप करणाऱ्या विरोधकांना संजय शिरसाट यांनी सुनावले!

Minister Sanjay Shirsat hits back at opposition leaders over allegations in the Hotel Vites case, claiming they are unable to tolerate the progress of the Marathi community. : तुमचा आक्षेप असेल तर कोर्टाच्या समोर जा, चुकीचं केलं हे सांगा ना. कोर्टाच्या विरोधात तुम्ही बोलताय, ब्लॅकमेल करण्यासाठी रचलेला हा डाव आहे.

Jagdish Pansare

Assembly Session News : छत्रपती संभाजीनगर येथील हाॅटेल व्हिट्स खरेदी व त्यासाठी राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवरुन विरोधकांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना सभागृहात घेरले. शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत यांच्या मुलाच्या कंपनीने हाॅटेल खरेदीसाठी निविदा भरली होती. राजकीय दबाव आणून संजय शिरसाट यांनी अधिकाऱ्यांना नियम-अटी डावलून हाॅटेल खरेदी केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केला.

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे नाव घेऊन आरोप झाल्यामुळे सभापतींनी त्यांना सभागृहात बाजू मांडण्याची परवानगी दिली. विरोधकांच्या गोंधलातच शिरसाट यांनी बोलायाला सुरवात केली. मला बोलायचं नव्हतं, पण माझं नाव घेतलं म्हणून मी बोलतोय. तुम्हाला नेमकं काय हवं आहे? आधी हाॅटेलच्या किमंतीवर आक्षेप घेतला, मग निविदा प्रक्रियेवर. मुळात तीस वर्षापुर्वी हे हाॅटेल स्थापन झाले होते. काही शेअर होल्डर एकत्रित आले त्यांनी कंपनी स्थापन केली. पण त्यांना फसवणूक झाली असं वाटलं आणि त्यांनी आपले पैसे परत मिळावे म्हणून कोर्टात धाव घेतली.

कोर्टाच्या आदेशाने टेंडर काढले गेले, किंमत ठरवली गेली. (Ambadas Danve) यात अधिकाऱ्याचा संबंध काय? टेंडरमध्ये सहभागी होतांना नाॅमिनल रक्कम भरावी लागते, टेंडर मंजूर झाल्यानंतर उर्वरित 75 टक्के रक्कम भरावी लागते. यांना प्रोसेस कळाली नाही, हे दलाली करत आहेत, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला. तुमचा आक्षेप असेल तर कोर्टाच्या समोर जा, चुकीचं केलं हे सांगा ना. कोर्टाच्या विरोधात तुम्ही बोलताय, ब्लॅकमेल करण्यासाठी रचलेला हा डाव आहे.

दलाली करण्यापेक्षा माझं ऐकून घ्या. कायदा कळत नसेल तर आमच्याकडून शिकून घ्या. यांना फक्त भांडवल करायचं आहे, शिवसेनाप्रमुख असते तर यांना जोड्याने मारले असते. मराठी माणूस पुढे गेलेलं यांना बघवत नाही, माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे संजय शिरसाट यांनी सभागृहात सांगितले. दरम्यान, विरोधकांनी सभागृहात संजय शिरसाट यांना बोलू देणे नियमात नाही, असा आक्षेप सभापती राम शिंदे यांच्याकडे नोंदवला. तसेच संजय शिरसाट राजीनामा द्या, अशी घोषणाबाजी केली.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तुम्ही संजय शिरसाट यांचे सभागृहात नाव घेतल्यामुळे त्यांना बाजू मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांची बाजू घेतली.या प्रकरणात महसुल मंत्र्यांनी स्पष्ट केले की प्रक्रिया रद्द केली आहे, नव्याने प्रक्रिया केली जाईल. मंत्र्यांनीही खुलासा केला आहे, तो तुम्हाला मान्य असो की नसो! या शिवाय निविदा प्रक्रियेत जी अनियमितता झाली असेल त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT