Ambadas Danve News : 'देव- देश- धर्म अन् आता भाषा' अशा मंत्राची गरज! प्रादेशिक अस्मिता मोडीत काढू पाहणाऱ्यांना धडा शिकवू..

Shiv Sena leader Ambadas Danve issues a strong warning to those attempting to undermine regional identity, emphasizing the party’s commitment to protecting cultural and linguistic pride. : तामिळ आणि मराठी संस्कृती वेगवेगळ्या असतील पण 'अस्मिता'हा यातील समान धागा आहे.
Ambadas Danve On Marathi News
Ambadas Danve On Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT : हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात महाराष्ट्रात ठाकरे बंधु एकत्र आले. मराठी माणूस एकजूट झाला आणि प्रादेशिक अस्मिता मोडीत काढू पाहणाऱ्या सरकारला माघार घ्यावी लागली. यापुढे राज्यात देव-देश-धर्म अन् भाषा अशी या मंत्राची व्याप्ती वाढवावी लागेल, अशी अपेक्षा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. प्रादेशिक अस्मिता मोडीत काढू पाहणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मराठी माणूस, शिवसेना आणि शिवसैनिक सदैव सोबत राहतील, असे दानवे यांनी म्हटले आहे.

उद्धव-राज ठाकरे यांचा मराठी भाषेसाठी एकजूट दाखवत पार पडलेल्या विजयी मेळाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. वीस वर्षानंतर ठाकरे बंधु एकत्र आल्याने याची चर्चा देशभरात होताना दिसते आहे. ज्या मराठी भाषेसाठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधात हे दोन भाऊ एकत्रित आले आहेत. ती भाषा अधिक प्रगल्भ करत तिची व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचे अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी 'एक्स' वर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तामिळ आणि मराठी (Marathi) संस्कृती वेगवेगळ्या असतील पण 'अस्मिता'हा यातील समान धागा आहे. काळाच्या ओघात हिंदी थोपणाऱ्यांच्या विरुद्ध तामिळनाडूच्या जनतेने दिलेला धडा हा निश्चित मोठा आहे. महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या विरुद्ध ठाकरे बंधुनी दंड थोपटले आणि राज्य सरकारला माघार घ्यावीच लागली. मात्र हा विजय अंतिम विजय निश्चित नाही. मराठी भाषेसाठी अजून खूप काम बाकी आहे, ते ही करूच!

Ambadas Danve On Marathi News
Marathi Vijay Melava: मराठीसाठी दोन भाऊ एकत्र येणार, किमान 3 प्रश्नांची उत्तरे आज देतील का?

हिंदीच्या तुलनेत मराठी भाषेचा इतिहास आपल्याला खूप मागापर्यंत नेतो. मात्र काळाच्या ओघात पारतंत्र्यात पडलेल्या महाराष्ट्रात जसे आक्रमण येथील भूमीवर झाले, तसेच भाषेवरही होत गेले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतंत्र शब्दकोश तयार करून फारसी शब्दांना अस्सल मराठी शब्द उभे करावे लागले होते. आज हे काम आपल्याला आपापल्या राज्यात करावे लागणार आहे.

Ambadas Danve On Marathi News
Shivsena-MNS Alliance: अखेर तो क्षण आलाच! शिवसेना-मनसे युतीची उद्धव ठाकरेंकडून घोषणा; म्हणाले, एकत्र आलोय...

देव देश आणि धर्म हा मंत्र महाराष्ट्राने कायम जोपासला आहे. आता या मंत्राची व्याप्ती वाढवून तो 'देव देश धर्म आणि भाषा'असा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. प्रादेशिक अस्मिता मोडीत काढू पाहणाऱ्यांना धडा शिकवताना तुम्हाला जिथे गरज पडेल, तिथे मराठी माणूस, शिवसेना आणि शिवसैनिक आपल्याला सदैव आपल्यासोबत उभे दिसतील, असा विश्वासही दानवे यांनी यातून व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com