नवनाथ इधाटे
Phulambri Fedration Election : विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री आणि कन्नड या दोन मतदारसंघात महिलांनी विजय मिळवला. भाजपाच्या अनुराधा चव्हाण आणि शिवसेनेच्या संजना जाधव यांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत पहिल्याच प्रयत्नात थाटात विधानसभेत एन्ट्री केली. त्यानंतर या दोन्ही आमदारांनी आपापल्या मतदारसंघावर पकड मिळवण्यास सुरुवात केली आहे. संजना जाधव यांनी चार माजी आमदारांच्या पॅनलचा कन्नडमध्ये धुव्वा उडवत सगळ्या जागा जिंकल्या. तर फुलंब्रीत अनुराधा चव्हाण यांनी काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या पॅनला धूळ चारली.
फुलंब्री मतदारसंघातील छत्रपती संभाजीनगर तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळ निवडणुकीत पंधरापैकी 14 जागा आमदार अनुराधा चव्हाण (Anuradha Chavan) यांच्या पॅनलने जिंकल्या. तर एकमेव जागा कल्याण काळे यांच्या पॅनला मिळाली ती ही अवघ्या एक मताने. या विजयानंतर आमदार अनुराधा चव्हाण यांचे नेतृत्व खासदार कल्याण काळे यांच्यावर भारी ठरल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. 2020 मध्ये कोरोनामुळे खरेदी-विक्री संघाची निवडणुक झाली नव्हती.
2015 च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे 6 संचालक व 1 शिवसेना असे युतीचे 7 संचालक निवडून आले होते. तर काँग्रेसचे 7 संचालक आणि एक अपक्ष असे पक्षीय बलाबल होते. एक अपक्ष भाजपसोबत आल्यामुळे भाजपाचे संख्याबळ 8 वर गेले आणि अध्यक्ष भाजपचा झाला होता. राज्यातील सत्तातंर, जालना लोकसभा मतदारसंघातून कल्याण काळे (Kalyan Kale) यांचा तर अनुराधा चव्हाण यांचा फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून झालेल्या विजयानंतर खरेदी-विक्री संघाची पहिलीच निवडणूक होती.
खासदार-आमदार या दोघांचेही पॅनल निवडणूक रिंगणात असल्याने कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. काँग्रेस प्रणित पॅनलची संपूर्ण प्रचार यंत्रणा खासदार कल्याण काळे यांच्या हाती होती. प्रचार सभा, बैठका घेऊन त्यांनी जोर लावला होता. तर भाजप प्रणित पॅनलचे नेतृत्व आमदार अनुराधा चव्हाण यांनी केले. प्रचार सभा, बैठका याचबरोबर वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेत त्यांनी नियोजनबद्ध यंत्रणा राबवली.
परिणामी भाजप प्रणित युतीच्या पॅनलचे 15 पैकी 14 उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले. तर 1 उमेदवार आवघ्या 1 मतांनी पराभूत झाला. सहकारी सोसायटी मतदारसंघात 5 पैकी 4 उमेदवार भाजपचे निवडून आले. तर वैयक्तिक मतदारसंघात सर्व 10 उमेदवार 500 मतापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले. या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सभापती राधकीनस पठाडे, श्रीराम शेळके रामराव शेळके, सजन मते दत्ता उकिर्डे यांनी मोलाचे योगदान दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.