Mla Sanotsh Bangar with Her Mother And DCM Eknath Shinde News Sarkarnama
मराठवाडा

MLA Santosh Bangar-Eknath Shinde : आमदार बांगर यांच्या आईला हार्ट अटॅक, फोन जाताच एकनाथ शिंदेंनी पाठवली एअर ॲम्ब्युलन्स!

MLA Santosh Bangar’s mother suffered a heart attack. CM Eknath Shinde promptly arranged an air ambulance : एवढेच नाही तर रात्री उशीरा मुंबई विमानतळावर स्वतः हजर राहत बांगर यांच्या मातोश्रींची भेट घेतली. ॲम्ब्युलन्स रुग्णालयाकडे रवाना झाल्यानंतरच त्यांनी विमानतळ सोडले.

Jagdish Pansare

Shivsena UBT : शिवसेनेत उठाव केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोबत गेलेल्या एकाही आमदार, मंत्र्‍यांवर संकट येऊ देणार नाही. माझा एकही सहकारी पराभूत होणार नाही, असे ठामपणे सांगत आपला शब्द खरा करून दाखवणारे राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचे अनोखे रुप पुन्हा पहायला मिळाले.

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या आईला अचानक हॉर्ट अटॅक आला. त्यांना उपचारासाठी तातडीने मुंबईला हलवावे लागणार असल्याचा फोन बांगर यांनी एकनाथ शिंदेंना केला. त्यानंतर अगदी काही वेळातच नांदेड विमानतळावर शिंदे यांनी बांगर यांच्या आईसाठी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली. एवढेच नाही तर रात्री उशीरा मुंबई विमानतळावर स्वतः हजर राहत त्यांनी बांगर यांच्या मातोश्रींची भेट घेतली. त्यांना काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल, असा दिलासा देत ॲम्ब्युलन्सने रुग्णालयात उपाचारासाठी रवाना केले आणि मगच त्यांनी विमानतळ सोडले. एकनाथ शिंदे यांच्या या मदतीबद्दल बांगर यांनीही त्यांचे आभार मानले.

संतोष बांगर यांच्या आई वत्सलाबाई बांगर यांना हृदयात तीन ब्लॉकेज असल्याचे निदान झाले. याबाबत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ हिंगोलीमध्ये एअर अ‍ॅम्ब्युलन्स पाठवत संतोष बांगर यांच्या आईंना मुंबईत आणले. संतोष बांगर यांच्या आईंवर मुंबईत उपचार सुरु आहेत. शनिवारी रात्री हिंगोली जिल्ह्यात वत्सलाबाई बांगर यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. वैद्यकीय तपासणीत हृदयात तीन ब्लॉकेजेस असल्याचे निदर्शनास आले.

स्थानिक डॉक्टरांनी त्यांना तातडीने मुंबईत हलवण्याचा सल्ला दिला. अशावेळी आमदार संतोष बांगर यांना एकनाथ शिंदे यांची आठवण झाली आणि थेट त्यांच्याशी संपर्क साधला. बांगर यांचा फोन आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीने नांदेड येथे खासगी एअर अ‍ॅम्ब्युलन्स पाठवली. वत्सलाबाई यांना या अ‍ॅम्ब्युलन्समधून मुंबईतील लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले. आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आमदार बांगर यांनी या संदर्भात ट्विटवरून माहिती देताना एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. माझ्या आईला तीन ब्लॉकेजेस निघाले. तातडीने पुढील उपचारासाठी मुंबईला जाण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर अ‍ॅम्ब्युलन्स पाठवली. स्वतः विमानतळावर येऊन आईच्या तब्येतीची विचारपूस करून धीर दिला. मनापासून धन्यवाद साहेब, असे त्यांनी म्हटले आहे. तर प्रत्येक शिवसैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य माझ्यासाठी कुटुंबासारखेच आहेत. संकटाच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे. ही मदत मी कोणत्याही पदामुळे नव्हे, तर कर्तव्य भावनेतून केल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT