Santosh Bangar News : हिंगोलीत महायुतीमध्ये भडका! भाजप जिल्हाध्यक्षांवर आमदार संतोष बांगर यांचे गंभीर आरोप..

Shiv Sena MLA Santosh Bangar has made serious allegations against the BJP district president : कुठल्याही कारणासाठी ते अधिकाऱ्यांना फोन करून पैसे मागतात. अगदी ग्रामसवेकापासून ते स्वस्त धान्य दुकानदारांनाही पैसे मागितले जात असल्याचा आरोप बांगर यांनी केला आहे.
Gajanan Ghuge-MLA Santosh Bangar Controversy News
Gajanan Ghuge-MLA Santosh Bangar Controversy NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena-BJP News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत आहेत, तसा महायुतीतील तणाव वाढत आहे. हिंगोलीमध्ये तर भाजप-शिवसेना या दोन पक्षातील वादाचा भडकाच उडाला आहे. कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजनान घुगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हर घर तिरंगा अभियानासाठी झेंडे उपलब्ध करून देण्यासाठी गजानन घुगे यांनी अधिकाऱ्यांना फोन केल्याचा आरोप बांगर यांनी केला. तर त्याला प्रत्युत्तर देतांना हिंगोली जिल्ह्यात बांगर यांच्या आशिर्वादानेच मटका व इतर अवैध धंदे सुरू असल्याचे घुगे यांनी म्हटले आहे.

मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांच्यावर गंभीर आरोप केले. कुठल्याही कारणासाठी ते अधिकाऱ्यांना फोन करून पैसे मागतात. अगदी ग्रामसवेकापासून ते स्वस्त धान्य दुकानदारांनाही पैसे मागितले जात असल्याचा आरोप बांगर यांनी केला आहे. मुख्यमंत्री आमचा आहे, असा दम जिल्हाध्यक्ष देतात. अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही म्हणून त्यांना धारेवर धरतात. या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहोत, असेही बांगर यांनी स्पष्ट केले.

घुगे यांनी आरोप फेटाळले..

दरम्यान, भाजपाचे (BJP) जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी मात्र आमदार बांगर यांचे आरोप फेटाळत कोण कशी संपती कमावत आहे, हे सगळ्यांना माहित आहे. माझे काही गुटख्याचे, मटक्याचे व्यवहार नाहीत. संपत्ती कोण गोळा करत आहे, हे सगळ्या जिल्ह्याला माहित आहे, असा पलटवार घुगे यांनी केला आहे. राहिला प्रश्न हर घर तिरंगा मोहिमेचा, तर यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन हजार तर हिंगोली नगर परिषदेकडून बाराशे झेंडे पुरवण्यात आले आहेत.

Gajanan Ghuge-MLA Santosh Bangar Controversy News
Santosh Bangar News: सीएम फडणवीसांची 'वॉर्निंग' शिंदेंच्या लाडक्या आमदारानं धुडकावली? सरकारी अधिकाऱ्यालाच भरला दम; व्हिडिओ व्हायरल

त्यामुळे झेंड्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे मागण्याचा प्रश्नच येत नाही. बांगर हे आपले पाप झाकण्यासाठी खोटे आरोप करत असल्याचे घुगे यांनी स्पष्ट केले.एकूणच आमदार संतोष बांगर यांच्या या गंभीर आरोपानंतर भाजपाच्या गोटात संतापाचे वातावरण आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका महायुती एकत्र लढणार, असे राज्य पातळीवरील नेते सांगत आहेत. तर स्थानिक पातळीवर मात्र महायुतीली पक्षांमध्येच मतभेद असल्याचे दिसून आले आहे.

Gajanan Ghuge-MLA Santosh Bangar Controversy News
'मंत्रिमंडळात फेरबदल झाला तर संतोष बांगरला मंत्रिपद देतील', Santosh Bangar यांचं विधान | Hingoli |

आमदार संतोष बांगर हे आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. गरीबांना मदत करण्यात ते अग्रेसर राहिल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग हिंगोली जिल्ह्यात आहे. परंतु कायम वादग्रस्त विधाने करून बांगर वाद ओढावून घेतात. भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे हे देखील माजी आमदार आहेत. जिल्ह्यातील या दोन प्रमुख नेत्यांमधील वादावर वरिष्ठ काय अॅक्शन घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com