Shivsena Mla Santosh Bangar
Shivsena Mla Santosh Bangar Sarkarnama
मराठवाडा

आमदार बांगरांना झालयं काय? वादग्रस्त विधाने करतात.. नंतर म्हणतात `तो मी नव्हेच`!

सरकारनामा ब्युरो

हिंगोली : कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून एसटी कर्मचाऱ्यांच्या विलनीकरणाची मागणी योग्य असल्याचे सांगत त्यांची मागणी मान्य करावी, असे म्हटले होते. (Shivsena) पण लगेच ते पत्र आपले नाही, असे सांगत घुमजाव केले. (Hingoli) आता आठवडा उलटत नाही तो पुन्हा एकदा त्यांच्यावर घुमजाव करण्याची वेळ आली आहे. (Marathwada)

हिंगोली पोलीस ठाण्याताली दोन पोलिस निरीक्षकांच्या विरोधात १८ जानेवारीला आपण जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषणाला बसणार असल्याचे पत्र बांगर (Mla Santosh Bangar) यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले होते. मात्र आता आपण असे कुठलेच पत्र लिहले नव्हते, असे म्हणत `तो मी नव्हे`,अशी भूमिका बांगर यांनी घेतली आहे.

माझ्या संपर्क कार्यालयात स्वाक्षरी केलेली अनेक पत्र ठेवलेली असतात, त्याचाच कुणीतरी दुरूपयोग केला असावा, पण आपली त्याबद्दल कुठलीच तक्रार नसल्याचा आश्चर्यकारक पावित्रा देखील बांगर यांनी घेतला आहे. कोरोना काळात जनतेला रेमडिसेव्हिर वेळेवर मिळावे म्हणून स्वतःची ९० लाखांची एफडी मोडून वितरकाला पैसे दिल्याचे सांगत बांगर यांनी राज्यभरातून वाहवाह मिळवली होती.

पण त्यानंतर या संदर्भात जेव्हा जेव्हा त्यांना पत्रकार किंवार प्रसारमाध्यमांनी छेडले तेव्हा मात्र त्यांनी या विषयावर बोलणे टाळले होते. आता दोन आठवड्यात बांगर यांनी आपल्याच भूमिकेवरून घुमजाव केल्याने सगळेच बुचकळ्यात पडले आहेत. आपल्या विरोधकांवर दबाव आणण्यासाठी पत्र प्रपंच करायचा अन् नंतर घुमजाव करायचे ही बांगर यांची जुनी खोड असल्याचे आता त्यांचे विरोधक सांगत आहेत.

७ जानेवारी रोजी बांगर यांच्या स्वाक्षरीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेले एक पत्र समोर आले होते. यात बांगर यांची महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भूमिका घेत एसटी कर्मचाऱ्यांची राज्यशासनात विलनीकरण करून घेण्याची मागणी योग्य असल्याचे सांगत त्याला पाठिंबा दर्शवला होता.

राज्यभरात हे पत्र बांगर यांनी एसटीच्या विलीणीकरणाची केलेली मागणी चर्चेचा विषय ठरली होती. परंतु शिवसेनेच्या वरिष्ठांकडू कानउघाडणी झाल्यानंतर बांगर यांनी हे पत्र आपण पाठवलेच नाही, अशी भूमिका घेतली. हा प्रकार लोक विसरत नाही, तोच असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे.

हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आपल्याला नाहक बदनाम करण्यासाठी वेळोवेळी आपल्या घरी येऊन चौकशी करतात, कुटुंबातील सदस्यांना तुम्हाला आत टाकीन अशा धमक्या देतात, असा आरोप बांगर यांनी पत्राद्वारे केला होता.

विरोधकांच्या दबावाखाली हे अधिकारी आपल्याला हेतुपूरस्पर त्रास देत आहेत, त्यांना निलंबित करा, नाहीतर १८ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषणाला बसतो, असा इशारा देखील बांगर यांनी या पत्रात दिला होता. विशेष म्हणजे बांगर यांच्या स्वाक्षरीचे हे पत्र सोशल मिडियावर देखील व्हायरल झाले होते. मात्र आता हे पत्र देखील आपले नाही, कुणीतरी खोडसाळपणाने ते व्हायरल केले आहे, असा दावा बांगर यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT