Aurangabad Ncp News Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad Ncp : गेल्यावेळी सोबत असलेले आमदार चव्हाण शहरातच, तर विक्रम काळे नाॅटरिचेबल ..

Maharashtra : चव्हाण आणि विक्रम काळे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदासाठी इच्छूक होते.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपुर्ती होत नाही, तोच राष्ट्रवादीतही फूट पडली. औट घटकेचा पहाटेचा शपथविधी फसल्यानंतर चार वर्षांनी पुन्हा अजित पवारांनी बंड पुकारत भाजपसोबत हातमिळवणी केली. (Aurangabad Ncp) गेल्यावेळीच्या बंडात अजित पवारांच्या खांद्याला खांदा लावून सोबत असलेले मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण आज मात्र त्यांच्यासोबत नव्हते. ते शहरातच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळाची निवडणूक असल्यामुळे ते शहरातच थांबल्याचे बोलले जाते. (Ajit Pawar) अजित पवारांच्या बंडा संदर्भात जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. (Ncp) सतीश चव्हाण हे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे गेल्या तीन टर्मपासून प्रतिनिधित्व करत आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नेत्या सुप्रिया सुळे यांच्याशी चांगले संबंध असलेल्या चव्हाण यांची अजित पवारांशी घनिष्ठ मैत्री आहे. (Marathwada) पहाटेच्या शपथविधी सोहळ्याच्यावेळी सतीश चव्हाण यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती, असे बोलले जाते. त्यामुळे आज झालेल्या बंडाबाबत नेमंकी चव्हाण यांची भूमिका काय आहे?

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत वर्चस्व कायम राखल्यानंतर आज रात्री ते मुंबईला रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे दुसरे आमदार मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे विक्रम काळे हे देखील नाॅटरिचेबल आहे. त्यांच्याशी संपर्क साधला, परंतु तो होवू शकला नाही. चव्हाण आणि विक्रम काळे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदासाठी इच्छूक होते. जाहीर कार्यक्रमातून त्यांनी अनेकदा ही इच्छा बोलून दाखवली होती. उदगीरचे आमदार संजय बनसोड यांना आमदार झाल्याबरोबर मंत्रीपद मिळाले होते.

आता दुसऱ्यांदा अजित पवारांनी बनसोडे यांना पहिल्या ९ मंत्र्यांमध्ये स्थान दिले. त्यामुळे सतीश चव्हाण, विक्रम काळे काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्वाच ठरणार आहे. शरद पवारांनी संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवतांना भाकरी फिरवली. त्यानंतर नाराज झालेल्या अजित पवारांची भाजपशी सलगी वाढली होती. मध्यतंरी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना देखील जोर आला होता. मात्र थेट भाजपमध्ये न जाता अजित पवारांनी निम्मी राष्ट्रवादी सत्तेत नेली. ९ मंत्र्यांचा शपथविधी करत पवारांनी शिवसेनेच्या पावलावर पाऊल टाकल्याची चर्चा देखील या निमित्ताने होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT