Latur Ncp News : लातूरची राष्ट्रवादी अजित पवारांसोबत..

Ncp : अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील हे देखील अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.
Latur Ncp News
Latur Ncp NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : पहाटेच्या शपथविधीच्या वेळी केलेले बंड फसल्यानंतर अजित पवारांनी राज्याच्या राजकारणात दुसऱ्यांदा बंड पुकारले. तीसहून अधिक आमदार सोबत असल्याचा दावा करत अजित पवारांनी आज दुपारचा शपथविधी यशस्वी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. (Latur Ncp News) यावेळी त्यांच्यासोबत शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे अनेक ज्येष्ठ नेते असल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

Latur Ncp News
Ajit Pawar New DCM : अजितदादांसोबत छगन भुजबळही मंत्रिपदाची शपथ घेणार; पवारांचे निकटवर्तीय पटेल, वळसे पाटीलही राजभवनावर

मराठवाड्याचा विचार केला तर पुर्वीच्या बंडाप्रमाणेच यावेळीही अजित पवारांना साथ मिळाल्याचे चित्र आहे. (Latur) लातूर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी उदगीर आणि अहमदपूर या दोन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. (Ncp) पैकी उदगीरचे माजी मंत्री संजय बनसोड यावेळीही अजित पवारांसोबत दिसले.

ज्या अजित पवारांमुळे आमदारकी आणि पहिल्याच फटक्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले, त्या पवारांची साथ त्यांनी सोडली नाही. (Marathwada) अजित पवारांनी देखील संजय बनसोडे यांच्यावर विश्वास दाखवत ज्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यामध्ये त्यांना स्थान दिले.

दुसरे अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील हे देखील अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. ते देखील अजित पवारांसह ९ मंत्र्यांनी घेतलेल्या शपथविधी सोहळ्याला हजर होते. त्यामुळे ते देखील अजित पवारांसोबतच असल्याचे स्प्ट झाले आहे.

मराठवाड्यातील उस्मानाबाद, परभणी, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीची फारशी ताकद आणि आमदार देखील नाहीत. तर हिंगोली जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे हे देखील अजित पवारांसोबतच असल्याची माहिती आहे. अजित पवारांनी स्वतः फोन करून त्यांना कालच मुंबईत बोलवून घेतले होते.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com