EX Minister Dhananjay Munde News Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde News : धनंजय मुंडे यावर्षी वाढदिवस साजरा करणार नाही; कोणाला भेटणारही नाहीत!

MLA Dhananjay Munde has announced he won’t celebrate his birthday this year : नमस्कार! आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने व प्रेमाने मला प्रत्येक वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने आशीर्वाद व शुभेच्छा देऊन आपले प्रेम व्यक्त करत असता.

Jagdish Pansare

Beed NCP News : गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यंदा आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. आपण वाढदिवस का साजरा करणार नाही? याची कारणं देत त्यांनी आपल्या समर्थकांना आवाहन करणारी पोस्ट सोशल मिडियावर केली आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी या वर्षातील गेली चार-पाच महिने अत्यंत कठीण, संकट घेऊन येणारी ठरली.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्याशी असलेले हितसंबंध, व्यवसायातील भागीदारी आणि त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आरोप झाला होता. विरोधकांनी केलेले आरोप आणि दाव्यांमुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. राजकीय संकटासोबतच त्यांना करूणा मुंडे-शर्मा यांच्याविरोधात सुरू असलेल्या न्यायालयीन प्रकरणातही दणका बसला.

या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात मनःशांतीसाठीच्या शिबिरातही सहभाग नोंदवला होता. (Beed News) मुंबईत सुरू असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातला त्यांचा वावर हा पुन्हा नव्याने आत्मविश्वासपूर्ण वाटला. या सगळ्या ताण-तणाव, संकटातून जात असताना येणारा यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.

नमस्कार! आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने व प्रेमाने मला प्रत्येक वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने आशीर्वाद व शुभेच्छा देऊन आपले प्रेम व्यक्त करत असता; मात्र यावर्षी मराठवाड्यात बहुतांश भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. त्यात आपले ज्येष्ठ सहकारी स्व. आर. टी. जिजा देशमुख यांचे अकाली निधन व एकूण सध्याची परिस्थिती पाहता मी यावर्षी वाढदिवस साजरा करणार नाही.

माझ्या सहकारी बांधवांना विनंती आहे की, वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनरबाजी जाहिराती आदींवरील खर्च टाळून त्याऐवजी सामाजिक उपक्रम राबवावेत. दि.15 जुलै रोजी आपल्या भेटीसाठी उपलब्ध राहू शकणार नाही, त्याबद्दल क्षमस्व! आपले प्रेम, आशीर्वाद व शुभेच्छा हीच माझी ताकद असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मिडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT