Mla Kailas Patil News  Sarkarnama
मराठवाडा

Kailas Patil On Reservation: सरकार पुन्हा गाजर दाखवतंय..

Jagdish Pansare

Dharashiv Political News : मराठा आरक्षणाचा विषय पेटला आहे. गेल्या दहा दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण व कुणबी जातीचा दाखला मिळावा यासाठी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू आहे. (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी यासाठी लढा उभा केला आहे. सरकारने यावर काल निर्णय जाहीर केला, वंशावळीच्या निजामकाळातील महसुली नोंदीनूसार कुणबी जातीचा दाखला देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

यावर ठाकरे गटाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील (Kailas Ghadge Patil) यांनी टीका करत सरकार पुन्हा एकदा गाजर दाखवतंय, असा आरोप केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देखील वंशावळीच्या नोंदी ऐवजी सरसकट मराठा समाजाला कुणबी जातीचा दाखला द्यावा, अशी मागणी करत उपोषण सुरूच ठेवणार असलल्याचे जाहीर केले.

या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर आमदार कैलास घाडगे पाटील यांनी यावर मत व्यक्त केले आहे. (Shivsena) सरकार पुन्हा एकदा गाजर दाखवतंय, असा आरोप करत त्यांनी वस्तुस्थिती मांडली. (Marathwada) आजही तहसील कार्यालयात वंशावळ, रक्ताच्या नात्यातला कुणबी दाखला अन् तत्सम कागदपत्रे घेऊन गेल्यास कुणबी दाखला मिळतोच, यात नवीन काहीच नाही.

सरकार मराठा समाजाला फसवतंय, समाजाची दिशाभूल करतंय. ज्या बांधवांना हे शक्य नाही त्यांनी करायचं काय? असा प्रश्न उपस्थितीत करत कैलास पाटील यांनी सरकारच्या निर्णयावर शंका उपस्थितीत केली आहे. अंतरवाली सराटीतील उपोषणाला दहा दिवस झाले आहेत. सरकारने या संदर्भात जीआर काढण्याची तयारीही दर्शवली.

परंतु वंशावळीच्या मुद्यामुळे ज्यांच्याकडे नोंदी नाही, त्यांना कुणबी जातीचा दाखला मिळणार नाही. त्यामुळे सरकट दाखला देण्याची मागणी आणि उपोषण पुढे सुरूच ठेवण्याचा जरांगे यांचा निर्णय यावर आता सरकार काय भूमिका घेते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT