सचिन वाघमारे -
Chhatrapati Sambhajinagar News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले होते. त्याचवेळी एका तरुणाला बोलताना बीड जिल्ह्यात अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या तोंडून काही अपशब्द गेले होते.याचे रेकॉर्डिंग तरुणाने केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. सोळंके यांची ऑडिओ क्लिप व्हायरल त्यासोबतच सोळंके यांच्याविषयी मराठा समाजात गैरसमज निर्माण झाले होते.
त्यातूनच आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या बंगल्यावर देखील मराठा आंदोलकांनी हल्ला केला होता. यांच्या बंगल्यावर आधी दगडफेक आणि नंतर जाळपोळ करीत मोठे नुकसान केले होते. त्यानंतर शुक्रवारी छत्रपती संभाजी नगर येथील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटलांची भेट घेत सोळंके यांनी वादावर पडदा टाकला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांनी (Manoj jarange Patil) मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून रान पेटवले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज्यात हिंसक वातावरण निर्माण झाले होते. आमदार प्रकाश सोळंके यांच्या तोंडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांच्या तोंडून काही अपशब्द गेले होते. त्यामुळे सोळंके यांच्या बंगल्यावर देखील मराठा आंदोलकांनी हल्ला केला होता. यांच्या बंगल्यावर आधी दगडफेक आणि नंतर जाळपोळ करत मोठे नुकसान केले होते.
छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये आमदार सोळंके यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या तब्येतेची विचारपूस केली. त्यासोबतच आमदार सोळंके यांनी जरांगेंची भेट घेत आंदोलनादरम्यान निर्माण झालेले गैरसमज दूर करत या वादावर पडदा टाकला.
सोळंके म्हणाले, ‘प्रत्यक्ष भेट घेऊन मनोज जरांगे पाटलांचा काही गैरसमज दूर केला. मी पहिल्यापासून मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून पुढाकार घेत आहे. मी मराठा असल्याने माझा याला विरोध असण्याचं कारण नाही. केवळ एका तरुणाला बोलताना रेकॉर्डिंग करू नको, असे सांगितले होते. त्यांनी न ऐकताच दोघांचे वैयक्तिक मत रेकॉर्डिंग केले व व्हायरल केले.
मी त्यामध्ये केवळ सरकारला वेळ द्याला हवी, असे म्हटले होतो. त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. त्यामुळेच मी मनोज जरांगे यांची भेट घेऊन काही गैरसमज दूर करा, अशी विनंती केली असल्याचे स्पष्ट केले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.