Omraje Nimablkar, Rana Patil News Sarkarnama
मराठवाडा

Rana patil V/s Omraje Nimabalkar : मुंबईच्या आढावा बैठकीतून धाराशिवचे पालकमंत्री, खासदारांचे नाव वगळले! राणा पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम!

MLA Rana Patil targets Guardian Minister Pratap Sarnaik and MP Omraje Nimbalkar, as their names were excluded from the Mumbai review meeting : राणा पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संघर्षात आणखी एका प्रकारामुळे वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Jagdish Pansare

Dharashiv Politics : धाराशिव जिल्ह्यातील कुरघोडीच्या राजकारणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच गाजते आहे. विशेषतः तुळजापूरचे भाजपा आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्षाचा भडका वारंवार उडत असतो. तुळजापूरच्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात या दोघांनी एकमेकांवर बरेच आरोप-प्रत्यारोप केले. अगदी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही अनेकदा या दोन नेत्यांमध्ये राडा झाल्याचे दिसून आले आहे.

राणा पाटील, (Ranajagjeetsingh Patil) खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संघर्षात आणखी एका प्रकारामुळे वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईत आज होत असलेल्या तुळजाभवानी मंदीर जीर्णोधार आढावा बैठकीतून भाजपाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे नाव ऐनवेळी वगळण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मुंबईत ही महत्वाची बैठक आज होत आहे.

तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार आढावा बैठकीतून पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव सुरुवातीला निमंत्रण पत्रिकेत होते. मात्र, अंतिम यादी आली तेव्हा ही दोन्ही नावे वगळण्यात आली. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज 18 ऑगस्ट रोजी मुंबईत ही महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

या बैठकीत आधी सरनाईक आणि निंबाळकर यांची नावे वगळण्यात आली. जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांची नावे वगळण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. या वादानंतर मंत्रालयाकडून अधिकृत पत्र काढून धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांची नावे समाविष्ट करण्यात आली होती. दोघांचीही नावे बैठकीसाठी समाविष्ट करण्यात आल्याने वाद निवळला होता.

मात्र पुन्हा अचानक ऐन बैठकीच्या एक दिवस आधी अंतिम यादीतून पुन्हा या दोन्ही नावांवर फुली मारण्यात आली. खासदार ओमराजे निंबाळकर हे विरोधी पक्षाचे असल्याने त्यांचे नाव वगळले तरी ते चुकीचेच ठरते. परंतु सत्ताधारी शिवसेनेचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या सरनाईक यांनाही या बैठकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. यावरून महायुतीमधील वादही या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, आज सकाळी साडेदहा वाजता झालेल्या या बैठकीत सरनाईक, ओमराजे हे दोघेही उपस्थित नव्हते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT