Dharashiv Controversy: धाराशिवमध्ये खासदार ओमराजे अन् एकनाथ शिंदेंच्या नेत्यामध्ये राडा; मंत्र्यांनी बैठकच गुंडाळली

Omraje Nimbalkar Vs Eknath Shinde : खासदार ओमराजे निंबाळकर आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे आनंद पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर दोन्ही ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही आमने सामने आले.
Dharashiv news.jpg
Dharashiv news.jpgSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News: राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतच धाराशिवमध्ये शुक्रवारी (ता.15) तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेचे अध्यक्ष आनंद पाटील यांच्यात पवनचक्कीच्या मुद्द्यांवरुन बैठकीतच शा‍ब्दिक बाचाबाची झाली.या राड्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनीही बैठकच आटोपती घेतल्याचं समोर आलं आहे.

धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या कामासंदर्भातील तक्रारीवरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व धाराशिवच्या युवासेनेचे अध्यक्ष आनंद पाटील यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर बैठकीत मोठा तणावाचं वातावरण निर्माण होऊन एकच गोंधळ उडाला.

पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी बोलावलेल्या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते. ही बैठक शेतकरी तक्रारींसाठी होती. पण त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेचे अध्यक्ष आनंद पाटील आपला मुद्दा मांडत होते. त्यांना ओमराजेंनी मध्येच हटकल्यानंतर वाद पेटला.

Dharashiv news.jpg
GST Reforms: मोदींचे लाल किल्ल्यावरुन 'जीएसटी' कररचनेत फेरबदलाचे संकेत; काही तासांतच मोठी अपडेट समोर

ओमराजे निंबाळकर यांनी आनंद पाटील यांना बोलण्यास रोखताना आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू मग राजकीय नेत्यांनी बोलावं अशी मागणी केली. यानंतर आनंद पाटील यांनी जिथल्या तक्रारी करतोच, त्या गावात तुमचे मामा ठेकेदार असल्याचं वाक्य उच्चारताच ओमराजेंचा भलताच पारा चढला.

खासदार ओमराजे निंबाळकर आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे आनंद पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर दोन्ही ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही आमने सामने आले. अखेर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आनंद पाटील यांच्यामध्ये सुरू असलेला वाद मिटवला.

Dharashiv news.jpg
Beed Politics: बीडमध्ये अजितदादा लवकरच दुसरा मोठा डाव टाकणार; पंकजा मुंडेंनंतर आता शरद पवारांना धक्का? आमदाराशी जवळीक वाढली

आनंद पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांना उद्देशून 'तुम्ही दोन्ही बाजूने बोलता, तुमचे मामा पवनचक्कीची गुत्तेदारी करतात आणि तुम्ही पवनचक्कीवाल्यांना दाब देता असं दोन्हीकडून ढोलकी वाजवू नका म्हटल्यानं ओमराजे भयंकर संतापले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com