Mla Salgar Meet Nilangekar News.
Mla Salgar Meet Nilangekar News. Sarkarnama
मराठवाडा

Mla Salgar Meet Nilangekar : कर्नाटकात विजयी झालेल्या आमदाराने निलंगेकरांची भेट घेत मानले आभार..

राम काळगे

Latur News : कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा (Karnataka Assembly Election) निकाल जाहीर झाला आणि महाराष्ट्रातून तिथे प्रचाराला गेलेल्या नेत्यांच्या यशाचे मोजमाप देखील केले जावू लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, काॅंग्रसेचे नेते अशोक चव्हाण, यांच्यासह पक्षातील आमदार, खासदारांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार तिथे केला. काही विजयी झाले, तर काहींच्या पदरी निराशा आली.

परंतु बसवकल्याण मतदारसंघातून विजयी झालेले (Bjp)भाजपचे आमदार शरनू सलगर यांनी खास आठवण ठेवत निलंग्याचे भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांची प्रत्यक्ष घेत आभार मानले. सलगर यांच्या बसवकल्याण मतदारसंघात निलंगेकर यांनी प्रचार केला होता. निलंगेकर यांचा या मतदारसंघात असलेल्या प्रभावामुळेच आपण विजयी झाल्याचे कृतार्थ भाव त्यांनी व्यक्त केले.

शरनु सलगर हे काँग्रेस उमेदवाराचा पंधरा हजारापेक्षा जास्त मतांनी पराभव करून विजय झाले आहेत. (Latur) बसवकल्याण मतदार संघावर संभाजी पाटील निलंगेकर यांचा मोठा प्रभाव असल्यानेच माझा विजय झाल्याचे सलगर यांनी निलंगेकरांच्या भेटीत कबुल केले. बसवकल्याण विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचे प्रभारी म्हणून संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रचार यंत्रणा प्रभावी व सक्षमपणे राबवली होती.

सलगर यांच्या विजयश्री खेचून आणण्यात निलंगेकर यांचे मोलाचे योगदान असल्याचे बोलले जाते. आज नवनिर्वाचित आमदार शरनु सलगर यांनी निलंगा येथील निलंगेकर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन ऋण व्यक्त करत आभार मानले. यावेळी निलंगेकर परिवाराच्या व भारतीय जनता पक्षाच्या वतीने फेटा बांधून शाल श्रीफळ व विठ्ठल मुर्ती देऊन देऊन सलगर यांचा सत्कार करण्यात आला. बिदर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघाचे प्रभारी स्टार प्रचारक निलंगेकर यांच्या नियोजनामुळे सहा पैकी चार जागांवर भारतीय जनता पार्टीने विजय मिळविला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT