Amit Deshmukh, Sambhaji Patil Nilangekar Sarkarnama
मराठवाडा

MLA Sambhaji Patil Nilangekar : तर मी निवडणुकीतून माघार घेईन..

Jagdish Pansare

राम काळगे

Nilanga Assembly Constituency : महायुतीच्या अडीच वर्षाच्या काळात मी युती सरकार असतांना आणलेल्या निधीच्या पाच टक्के जरी आला असेल, तर मी विधानसभा निवडणुकीतून बिनशर्त माघार घेईन, अशा शब्दात भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसला आव्हान दिले. संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदारसंघातील शंभर गावातून जन सन्मान यात्रा सुरू केली आहे.

तीनशे किलोमीटरच्या या पायी पदयात्रेवर काँग्रेसचे (Congress) प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी स्टटंबाजी म्हणत टीका केली होती. विरोधकांकडून यात्रेवर होत असलेल्या टीकेला संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तगरखेडा येथे यात्रे दरम्यान, विरोधकांच्या टीका आणि आरोपांना उत्तर देताना निलंगेकर यांनी काँग्रेसला खुले आव्हानच दिले.

मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांचा दाखला देत आपण रस्त्यावरची माणंस आहोत. ही पदयात्रा माझा लेखाजोखा देण्यासाठीची यात्रा आहे. राजकारण म्हणून नव्हे तर सर्व समाज घटकातील लोकांना सोबत घेऊन जाणारी ही वारी आहे. ही विकासाची वारी आहे. सर्वाधिक लाडकी बहीणी नोंद निलंगा मतदार संघात झाली आहे. 85 हजार महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत.

आपल्या सरकारच्या काळात बचतगट महिलांना सहकार्य केले. काँग्रेसच्या सत्तेत पैसे आले का ? या अडीच वर्षाच्या काळात मतदार संघात सर्वाधिक निधी खेचून आणला आहे. (Sambhaji Patil Nilangekar) काँग्रेसच्या काळात खडकूही मिळाला नाही. माझे विरोधकांना खुले आव्हान आहे, महाविकास आघाडीच्या म्हणजेच त्यांच्या सत्तेच्या काळात आलेला निधी आणि राज्यात युती सरकार असतांना मी आणलेला निधी याची तुलना करा.

माझ्या काळात आलेल्या निधीच्या पाच टक्के निधी जरी आघाडी सरकारमध्ये पालकमंत्री असलेल्या अमित देशमुख यांनी आणल्याचे सिद्ध केले, तर मी विधानसभा निवडणुकीतून बिनशर्त माघार घ्यायला तयार आहे, असे निलंगेकर यांनी यावेळी सांगितले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकर नेतृत्व करत असलेल्या निलंगा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे डाॅ. शिवाजी काळगे यांना मताधिक्य मिळाले होते.

तेव्हापासून निलंग्यात काँग्रेस इच्छुकांची संख्या वाढली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे आव्हान पाहता संभाजी पाटील निलंगेकर यांनी आतापासूनच तयारी सुरू केल्याचे बोलले जाते. मतदारसंघातील जन सन्मान यात्रा हा त्याचाच भाग असल्याची चर्चा या निमित्ताने तालुक्यात होत आहे. काँग्रेसकडून या यात्रेवर टीका होत असली तरी निलंगेकर यांना चांगला प्रतिसाद यात्रेच्या माध्यमातून मिळताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT