Sambhaji Patil Nilangekar : 2019मधील मताधिक्याची आठवण करून देत संभाजी पाटील निलंगेकरांचा अमित देशमुखांना टोला, म्हणाले...

Sambhaji Patil Nilangekar on Amit Deshmukh : जाणून घ्या नेमकं काय म्हणाले ? , निलंगा विधानसभा मतदार संघाच्या अधिवेशनात केलं आहे विधान!
Sambhaji Patil Nilangekar on Amit Deshmukh
Sambhaji Patil Nilangekar on Amit DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Latur Loksabha and BJP VS Congress : '2019 च्या लोकसभा निवडणुकीत लातूर शहर व ग्रामीण मतदार संघातील मताधिक्याची काय गत होती? ते आपण सांगावे. सध्या निलंगा मतदार संघातील मिळालेल्या मताधिक्याचं एवढं बोलताय.' असा खडा सवाल माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुखांना केला. निलंगा विधानसभा मतदार संघाच्या अधिवेशनात ते बोलत होते.

लातूर लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेस(Congress) विजयी झाली असून निलंगा विधानसभा मतदार संघातून 20 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. मागील निवडणुकीचे मोठे मताधिक्य मोडून काँग्रेसने ही जागा जिंकली आहे. त्यामुळे निलंगा विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून उमेदवारीसाठी मोठी स्पर्धाच लागली आहे.

Sambhaji Patil Nilangekar on Amit Deshmukh
Ram Shinde : संभाजी पाटील निलंगेकरांचा मतदारसंघ बदलणार? राम शिंदेंचं सूचक वक्तव्य

या पार्श्वभूमीवर संभाजीराव पाटील निलंगेकर(Sambhaji Patil Nilangekar) म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील वेगवेगळी गणितं होती. शिवाय यावेळी अपप्रचार झाला म्हणून हे काँग्रेसला यश आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आपण स्वतः समितीमध्ये असतांना पहील्यांदा मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे म्हणून मागणी केली होती.

तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लातूर शहरातून जवळपास 14 हजार तर लातूर ग्रामीण मतदार संघातून जवळपास 30 हजारांचे मताधिक्य भाजपा(BJP) महायुतीच्या उमेदवाराला होते याचेही भान त्यांनी ठेवावे. आठवण करून देतोय. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Sambhaji Patil Nilangekar on Amit Deshmukh
Supriya Sule : तुळजापूरमध्ये सुप्रिया सुळेंचं मोठं विधान; म्हणाल्या, 'भावाने मागितलं असतं तर पक्ष, चिन्ह दिलं असतं'

याशिवाय, निलंगा विधानसभा मतदार संघाचे अधिवेशन म्हणचे एक स्तुत उपक्रम असून जनतेने उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. आजपर्यंतचा प्रवास मतदार संघातील जनतेला माहीत आहे त्यांच्या अशीर्वादानेच आपण इथपर्यंत पोहचलो असल्याचेही संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com