Raj Thackeray, Sanjay shirsat,Eknath shinde  sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat News : "महायुतीला लोकसभेच्या 45 जागा जिंकणं अवघड नाही, राज ठाकरे..." शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

Political News :महायुतीच्या जागा वाटपा संदर्भात चर्चा होईल. त्यावेळी राज ठाकरे यांच्या समावेशाबद्दल देखील

Roshan More

Chhatrapati Sambhaji Nagar : मनसे प्रमुख राज ठाकरे हे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. शिंदेंच्या या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधान आले आहे. मुंबई महापालिकेत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षात युती होण्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात येतोय. या भेटीत काहीच राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मात्र, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याची मागणी केली आहे. राज ठाकरे महायुतीत आल्याने काय फायदा होईल, हे देखील शिरसाट यांनी सांगून टाकले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)आणि राज ठाकरे यांची भेट झाली मात्र राजकीय चर्चा झाली नाही, असे समजले. मात्र, राजकीय चर्चा व्हायला हवी. राज ठाकरे ( Raj Thackeray) यांना महायुतीत घेतले पाहिजे,असे माझे मत आहे. या बाबत आमचे वरिष्ठ निर्णय घेतील. भाजप, शिवेसना (शिंदे गट), राज ठाकरे एकत्र आले तर लोकसभेत 45 हून अधिक जागा जिंकणे अवघड नाही, असे आमदार संजय शिरसाट म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जानेवारीमध्ये महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल. त्यावेळी महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्या समावेशाबद्दल देखील चर्चा होईल, असा अंदाज आमदार क्षीरसाट यांनी व्यक्त केला. फेब्रुवारी महिन्यात लोकसभेची अचार संहिता लागू होईल. त्या आधीच या घडामोडी घडतील. राज ठाकरे हे महायुतीत असावे, अशी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण निर्णय तीनही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे, असे शिरसाट यांनी सांगितले.

दरम्यान,राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली.एकाच महिन्यात राज ठाकरे हे शिंदेंना दुसऱ्या भेटले आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर या भेटींना महत्त्व आले आहे. मराठी पाट्यांवर सर्वोच्च न्यायलयाने दिलेला निकाल, धारवी पुनर्विकास आदी मुद्यांवर मुख्यमंत्री शिंदेसोबत राज ठाकरेंची चर्चा झाल्याची शक्यता आहे. या भेटी वेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे देखील उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT