Marathwada News : आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचे `मिशन 45` पुर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मैदानात उतरणार आहेत. (CM Eknath Shinde News) नव्या वर्षात 6 जानेवारीपासून शिंदे महिनाभर राज्यातील विविध भागात दौरा करणार आहेत. मराठवाड्यात 10 जानेवारी रोजी ते हिंगोली, धाराशीव तर 11 जानेवारीला परभणी आणि संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा शिंदे करणार आहेत.
राज्यात आगामी लोकसभा निवडणुक महायुतीतील भाजप, शिंदेची (Shivsena) शिवसेना,अजित पवारांची राष्ट्रवादीसह अकरा पक्ष एकत्रित लढवणार आहेत. कुठल्याही परिस्थिती महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याचे उदिष्ट महायुतीने ठेवले आहे. कोणता पक्ष किती जागा लढवणार, कोणत्या मतदारसंघातून लढवणार याकडे फारसे लक्ष देऊ नका, महायुती म्हणून आपण संपुर्ण 48 जागा लढवणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसैनिकांसोबत झालेल्या आॅनलाईन बैठकीत स्पष्ट केले.
विरोधकांकडून महायुतीचे सगळे उमेदवार हे (BJP)भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार आहेत, असा दावा केला जातो. विरोधकांच्या कुठल्याही टीका, आरोप, दाव्याकडे फारसे लक्ष देऊ नका, असे आवाहनही शिंदे यांनी या बैठकीत केले. राज्यभरात लोकसभेच्या दृष्टीने भाजपची जोरदार तयारी सुरू आहे. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणारी `विकसित भारत संकल्प यात्रा` हा त्याचाच भाग आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपचे राज्यातील सर्वच नेते, मंत्री, खासदार, राज्यातील केंद्रात मंत्री असलेले सर्व या यात्रेत सहभागी होऊन प्रचार करत आहेत. या उलट महाराष्ट्राच्या सत्तेत असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांची मात्र फारशी तयारी दिसत नाही. परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपुर्ण राज्याचा दौरा करण्याची घोषणा करत आपल्या पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार आणि शिवसैनिकांना कामाला लावण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
शिंदे यांच्यासोबत असलेल्या 13 खासदारांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार? मतदारसंघाची अदलाबदल होणार का तेच कायम राहणार ? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असले तरी मुख्यमंत्री स्वतः बाहेर पडणार असल्यामुळे या खासदारांचा जीव भांड्यात पडणार आहे. कुठलाही ठोस कार्यक्रम नसल्यामुळे शिवसैनिकांमध्ये आलेली मरगळ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे निघून जाईल, अशी चर्चा या निमित्ताने होत आहे.
असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा..
येत्या 6 जानेवारीपासून विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. वाशिम, रामटेक येथेही त्यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. 8 जानेवारी रोजी अमरावती, बुलढाणा, 10 रोजी हिंगोली, धाराशीव 11 जानेवारी परभणी, संभाजीनगर. 21 जानेवारी शिरूर, माव़ळ, 24 जानेवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, 25 जानेवारी शिर्डी, नाशिक, तर 29 कोल्हापूर व 30 रोजी हातकंणगले असा हा दौरा असणार आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.