Santosh Bangar News Sarkarnama
मराठवाडा

MLA Santosh Bangar News : ठाकरेंनी गाडून टाकण्याची भाषा केली, अन् बांगरांचा जोश अजूनच वाढला..

Marathwada Political News : कावड यात्रेच्या माध्यमातून बांगर यांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.

सरकारनामा ब्युरो

Hingoli Political News : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी कालच्या निर्धार सभेत जोरदार टीका केली. ` ज्याला नाग समजून दूध पाजले, पूजा केली तोच डसला, आता त्याला गाडा`, अशा शब्दात ठाकरेंनी आमदार बांगर यांच्यावर हल्ला चढवला. (Kawad Yatra News) ठाकरेंच्या सभेवर प्रतिक्रिया देतांना बांगर यांनी `मी त्यांना उत्तर देण्याइतका मोठा नाही`, म्हणत संयमी भूमिका घेतली.

पण आज काढण्यात आलेल्या कावड यात्रेतून मात्र बांगर (MLA Santosh Bangar) यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. बांगर यांना गाडण्याची भाषा ठाकरेंनी केल्यानंतर तर त्यांच्या उत्साह अधिकच वाढल्याचे त्यांच्या देहबोली आणि तलवार फिरवण्यातून दिसून आले. (Shivsena) शिवसेनेतून फुटून शिंदे गटाने वेगळी चूल मांडल्यानंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर त्यांच्यासोबत गेले होते.

या दोघांच्या बंडानंतर पहिल्यादांच हिंगोलीत (Hingoli) आलेल्या उद्धव ठाकरे यांनी निर्धार सभेतून या दोघांचा उल्लेख गद्दार असा केला. बांगर यांना तर या निवडणुकीत गाडा, असे आवाहनच त्यांनी हजारोंच्या गर्दीला केला. पण दुसऱ्याच दिवशी कावड यात्रेच्या माध्यमातून बांगर यांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.

ठाकरेंनी गाडून टाकण्याची भाषा केली असली तरी जिल्ह्यातील शिवसैनिक आपल्यासोबतच असल्याचा दावा देखील बांगर यांनी यावेळी केला. बांगर यांच्या पुढाकारातून दरवर्षी श्रावणातील दुसऱ्या सोमवारी कावड यात्रा काढली जाते. चिंचाळेश्वर महादेव मंदिराजवळ बांगर यांनी कावड यात्रेचे विधिवत पूजन केले. त्यानंतर चिंचाळेश्वर महादेव मंदिरामध्ये अभिषेकासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

ठाकरे यांची काल झालेली सभा आणि त्यात त्यांनी बांगर यांच्याविरोधात केलेले आवाहन या पार्श्वभूमीवर यात्रे दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बांगर यांना यावेळी तलवारही देण्यात आली. ती म्यानातून काढत बांगर यांनी फिरवली आणि विरोधकांना सूचक इशाराही दिल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT