Ambadas Danve News : कागदावरील मुख्यमंत्री अन् दोन हाफ उपमुख्यमंत्र्यांनी बालविवाहाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे..

Shivsena UBT : पाच वर्षात साडेतीन हजार तर राज्यात दीडशेवर बालविवाह.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad Political News : `शासन आपल्या दारी`, या परभणीत झालेल्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. (Shivsena Political News) बोट दाखवण्याशिवाय त्यांच्याकडे राज्याला देण्यासाठी दिशा आणि धोरण नसल्याचे फडवीसांनी म्हटले होते. टीका करत असतांना राज्य सरकार सर्वसामान्यांसाठी कसे अठरा अठरा तास काम करत आहे, हे देखील सांगितले.

Ambadas Danve News
Sanjay Shirsat On Marathwada : मराठवाडा आता राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू, जे म्हणू तेच होईल..

ट्रिपल इंजिनचे सरकार सुसाट निघाले असून राज्याचा सर्वांगीण विकास करत असल्याचा दावा कालच्या भाषणातून राज्याच्या प्रमुखांनी केला होता. (Shivsena) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र तो खोडून काढला. या संदर्भात एका बातमीचा हवाला देत दानवे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री (Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डिवचले.

परभणी येथे २७ ऑगस्ट रोजी शासन आपल्या दारी या कार्यक्रमात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या विकासासाठी शक्ती गट निर्माण करणार असल्याची घोषणा केली आहे. (Marathwada) रोज नवनवीन घोषणा करण्यापेक्षा कागदावरील व दोन हाफ मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मुलींच्या या स्थितीकडे लक्ष द्यावे.

आपल्याला सत्तेची हाव नाही आणि छत्रपती शिवरायांच्या विचारावर तुम्ही शासन चालवत आहात. तर बालविवाहासारख्या व महिलांवरील अत्याचाराच्या भयावह घटना तुमच्याच आणि देशातील महाशक्तीच्या कार्यकाळात घडत आहेत, यावर जरा लक्ष असू द्या, असा टोलाही दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातू लगावला. पाच वर्षात साडेतीन हजार तर राज्यात दीडशेवर बालविवाह झाल्याची प्रकरणे समोर आल्याच्या बातमीचा हवाला दानवे यांनी ट्विटमध्ये दिला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com