तुषार पाटील
Bhokardan Constituency : बोगस बियाणे, मिरची पिकाची बोगस रोपे विक्री करणाऱ्या अनाधिकृत खाजगी रोपवाटिका, कृषी सेवा केंद्र आणि बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांना पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी चांगलाच दम भरला. अशो बोगस विक्रेत्यांची तात्काळ तपासणी करून कठोर कायदेशीर कार्यवाही करा, असे आदेशच दानवे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक व तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले.
गेल्या काही वर्षात भोकरदन तालुक्यात मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भोकरदन तालुक्यातून मुंबई, कलकत्ता आदी ठिकाणी मिरची विक्रीसाठी पाठवली जाते. मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या (Farmers) संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच गैरफायदा अनेक कंपन्या व काही फसवणूक करणारे विक्रेते घेत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. तालुक्यातील बहुतांश शेतकरी या पिकाला पसंती देत आहेत.
मात्र मिरची पिकाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी आमदार संतोष दानवे (Santosh Danve) यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. बोगस बियाणे आणि बोगस रोपांची विक्री करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यासाठी संतोष दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकर्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे व मिर्चीची रोपे मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कारवाई करण्यासाठी कृषी विभागाने विशेष तपास पथक तयार करावे, जे या प्रकारच्या विक्रीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकेल. या कार्यवाहीत फसवणूक करणाऱ्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा व शेतकर्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कृषी विभागाने विशेष जनजागृती मोहिमही सुरू करावी, असे दानवे यांनी म्हटले आहे. बोगस बियाणे आणि रोपे विकणाऱ्यांची जी माहिती मिळेल, त्या आधारावर त्यांना दंड किंवा बंदी घालण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
संतोष दानवे यांच्या भोकरदन-जाफराबाद मतदारसंघातील भोकरदन, पिंपळगाव रेणुकाई,राजूर, वालसावंगी, शिपोरा बाजार ,दानापूर, पारध आदी ठिकाणी मिरची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा कृषी विभागाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यास तसेच बोगस बियाणे व बोगस रोपे विक्री करणाऱ्या विक्रेत्याकडून फसवणूक झाल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा, असे आवाहन दानवे यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.