Mla Satish Chavan-Minister Abdul Sattar News
Mla Satish Chavan-Minister Abdul Sattar News Sarkarnama
मराठवाडा

Mla Satish Chavan News : सतीश चव्हाणांनी कृषी मंत्र्यांना निधीची घोषणा करायलाच लावली..

सरकारनामा ब्युरो

Vidhan Parisad : खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील प्रस्तावित अद्रक संशोधन केंद्र सुरू व्हावे यासाठी तीन महिन्यात प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सदरील केंद्रासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत केली. गारपीट, अवकाळी पावसावरील चर्चेला उत्तर देत असतांना मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी कृषीमंत्री सत्तार यांना खुल्ताबाद येथील अद्रक संशोधन केंद्राची आठवण करून दिली.

तसेच यासाठीच्या निधीची घोषणा आजच करा, अशी आग्रही मागणी केली. त्यानंतर निधीची घोषणा करण्यात आली. (Abdul Sattar) यासंदर्भात चव्हाण हे सातत्याने पाठपुरावा करत होते, अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले. (Marathwada) खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन करावे यासाठी चव्हाण शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करत होते. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात देखील त्यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अद्रक/मसाले पीक संशोधन केंद्राची आवश्यकता असल्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने गल्ले बोरगाव येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्यास मान्यता मिळविण्यासाठी सादर केलेला परिपूर्ण प्रस्ताव कृषी परिषदेने २२ सप्टेंबर २०२२ रोजी मान्य केला होता. त्यानंतर तो शासनाकडे सादर केला गेला, मात्र यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली नव्हती.

त्यामुळे यावर कार्यवाही का केली नाही? विलंबाची कारणे काय आहेत? असे प्रश्न चव्हाण यांनी तारांकित प्रश्नाव्दारे उपस्थित केले होते. सप्टेंबर २०२२ मध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन गल्ले बोरगाव येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी चव्हाण यांनी केली होती. त्यावेळी गल्ले बोरगाव येथे अद्रक संशोधन सुरू करण्यात येईल अशी घोषणा सत्तारांनी सभागृहात केली होती.

यावेळी गल्ले बोरगाव येथील अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्यासंदर्भात अर्थसंकल्पात निधीची काहीच घोषणा करण्यात आली नसल्याचे चव्हाण यांनी कृषी मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले. सत्तार यांनी सदरील अद्रक संशोधनन केंद्र सुरू व्हावे यासाठी तीन महिन्यात याची प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा सभागृहात केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT