MLA Pratap Patil Chikhlikar On Fadnavis-Ajit Pawar News Sarkarnama
मराठवाडा

Pratap Patil Chikhlikar On CM : फडणवीसांना मोठं पद मिळावं अन् अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत! चिखलीकरांचे पांडुरंगाला साकडे..

MLA Pratap Patil Chikhlikar expressed his wish for Devendra Fadnavis to be given a major political position and for Ajit Pawar to be appointed Chief Minister : देवेंद्रजी फडणवीस भक्कम पाठिंब्यावर मुख्यमंत्री आहेत.अजित पवार आणि फडणवीस यांचं सख्य आहे. पक्षाचा नेता मोठा व्हावा हे सगळ्यांना वाटतं तसं मलाही वाटतं.

Jagdish Pansare

Maharashtra Political News : राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याचा रेकाॅर्ड करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. स्वतः अजित पवारांनी अनेकदा मिश्किलपणे भाषणांमधून आपली सुप्त इच्छा व्यक्त केली आहे. आता त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आषाढी वारी निमित्त पंढपरपूरात विठूरायाचे दर्शन घेऊन घातलेल्या साकडाची चर्चा होत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केंद्रात मोठं पद मिळावं आणि अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली आहे. माध्यमांनी राष्ट्रवादीचे दुसरे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात केलेल्या विधानाचा संदर्भ देत चिखलीकर यांना प्रश्न केला तेव्हा त्यांनी वरील इच्छा व्यक्त केली. अमोल मिटकरी यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री होऊन पंढरपूरच्या विठ्ठलाची आषाढी एकादशीची पूजा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

हाच धागा पकडत लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांना माध्यमांनी प्रश्न केला. यावर मी पांडुरंगाच्या दर्शनासाठी 19 वर्षांपासून वारीत जात असतो. पांडुरंगाच्या चरणी लीन होतो, पांडुरंगाकडे राज्यातला शेतकरी कष्टकरी सुखी समृद्ध व्हावा, असे साकडे घातले. नांदेड आणि काही भागावर दुबार पेरणीचं संकट येणार होतं ते टळावं अशी प्रार्थनाही केली होती आणि ते टळलं.

मिटकरी म्हणाले की अजित पवार पुढच्या वेळी मुख्यमंत्री म्हणून पुजेला यावेत, त्यावर तुमचं काय ? मी निश्चितपणे सांगेन की देवेंद्रजी फडणवीस भक्कम पाठिंब्यावर मुख्यमंत्री आहेत. महायुतीत अजित पवार आणि फडणवीस यांचं सख्य आहे. महायुतीत एवढा भक्कम पाठिंबा असताना आपण ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचा नेता मोठा व्हावा हे सगळ्यांना वाटतं तसं मलाही वाटतं.

देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्रिपदापेक्षा मोठं पद मिळालं तर निश्चित दादाच मुख्यमंत्री होतील. दादाच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशी प्रार्थना पांडुरंगाकडे केली, असं चिखलीकर म्हणाले. जे सत्य आहे, मला जे वाटतं, माझं वैयक्तिक मत मांडलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं प्रमोशन झालं तर राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार व्हावेत, ही माझी भावना आहे ती पांडुरंगाकडे ठेवली आहे, असेही चिखलकरांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर लोहा-कंधार मतदारसंघातील उमेदवारीसाठी चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आमदार झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिल्या क्रमांकावर आणण्याची जबाबदारी अजित पवार यांनी चिखलीकरांवर सोपवली आहे. गेल्या चार महिन्यात अनेक पक्षातील मोठ्या नेत्यांना पक्षात आणत चिखलीकर यांनी आपली ताकद दाखवून दिली. अजित पवार यांच्या विश्वासूंपैकी एक म्हणून चिखलीकरांची ओळख आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT