Beed APMC News
Beed APMC News Sarkarnama
मराठवाडा

Beed APMC News : मतदानाला आलात तर जिवंत सोडणार नाही, आमदार क्षीरसागर, खाडे, म्हस्के यांनी धमकावल्याचा आरोप..

सरकारनामा ब्युरो

Market Committee : बाजार समिती निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतरही काका-पुतण्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप काही संपेनात. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांच्या पॅनलमधील उमेदवाराने आमदार संदीप क्षीरसागर, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलीक खाडे, व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी मतदारांना धमकावल्याचा आरोप केला आहे.

या संदर्भात त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून ऐन मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. (Beed) बाजार समितीच्या निवडणुकीला वेगळे वळण लागले आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे उमेदवार गणपत डोईफोडे यांनी संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांच्यासह खाडे, म्हस्के यांच्या विरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात मतदारांना धमकी दिल्याची तक्रार दिली आहे.

या धमकीचा कथित व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. (Bjp) गणपत डोईफोडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी आज सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान बीड तालुक्यातील ईट फाटा येथे थांबलो होतो. या दरम्यान काही बाजार समितीचे मतदार देखील होते. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, कुंडलिक खांडे आणि राजेंद्र मस्के हे तिथे आले. ते आम्हाला म्हणाले, की उद्या तुम्ही मतदान करायला येऊ नका.

जर उद्या मतदानाला आलात तर ३० तारखेला निकाल लागल्यानंतर तुम्हाला त्रास होईल. तुम्ही जर मतदानाला आलात तर एका एकाला जिवंत सोडणार नाही. या धमकीनंतर डोईफोडे यांनी पोलिसात तक्रार देत त्यांच्याकडून आमच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यामुळे मतदान करण्यासाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे.

जर आम्हाला काही धोका झाला तर यास संदीप क्षीरसागर, कुंडलिक खांडे आणि राजेंद्र मस्के हेच जबाबदार राहतील, असे देखील या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान पिंपळनेर पोलिसांनी डोईफोडे यांचा तक्रार अर्ज दाखल करून घेतला असून चौकशी आणि तपास सुरू केल्याचे पोलीस निरीक्षक कैलास भारती यांनी सांगितले. तर या संदर्भात दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी संदीप क्षीरसागर, कुंडलिक खांडे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होवू शकला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT