APMC Election News : बागडे, बंब, राजपूत, बोरनारेंची परिक्षा ; चार बाजार समित्यांसाठी उद्या मतदान..

Market Committee: जिल्ह्यातील सात बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.
APMC Election News
APMC Election NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : जिल्ह्यातील सात पैकी चार बाजार समित्यांसाठी उद्या (ता.२८) रोजी मतदान होत आहे. यामध्ये लासूर, (Kannad)कन्नड, वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितींचा समावेश आहे. गेल्या आठवडाभरापासून महाविकास आघाडी, भाजप-शिंदे युतीने एकमेकांच्या विरोधात जोरदार प्रचार केला.

APMC Election News
Ashok Chavan Thanaks To Nitin Gadkari : अशोक चव्हाण यांनी मानले गडकरींचे आभार..

आता प्रत्यक्षात मतदान होणार असल्याने भाजपचे आमदार प्रशांत बंब, (Prashant Bamb) हरिभाऊ बागडे, ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत, शिंदे गटाचे प्रा. रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्यासह स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे.

चार बाजार समितीच्या एकुण ७२ जागांसाठी २३२ उमेदवार रिंगणात असून, दहा हजार ९५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. (Aurangabad) तर या निवडणूकी प्रक्रियेसाठी सहकार विभागातर्फे १७० कर्माचारी पोलिस बंदोबस्तासह सज्ज असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक अधिकारी मुकेश बारहाते यांनी दिली.

जिल्ह्यातील सात बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यात छत्रपती संभाजीनगर, लासूर स्टेशन, वैजापूर, कन्नडच्या बाजार समितीसाठी उद्या (ता.२८) तर फुलंब्री, पैठण, गंगापूर या बाजार समितींसाठी ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार असून चार बाजार समितीपैकी लासूर स्टेशन बाजार समितीची मतमोजणी ३० एप्रिलला होईल. तर उर्वरित तीन बाजार समित्याची मतमोजणी शनिवारी (ता.२९) होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com