Chhatrapati Sambajinagar News Sarkarnama
मराठवाडा

MNS-Shivsena News : 'मनसे आणि दोनशे, उठ दुपारी- सुपारी..; शिवसेना ठाकरे अन मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने..

Chetan Zadpe

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 200 रुपयाची नोट मनसे कार्यकर्त्यांवर ओवाळली. जवळपास 15 ते 20 मिनिटापासून हा जो आमने सामने आल्याचा राडा सुरू आहे. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आले. यामुळे आता तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे. (Latest Marathiu News)

अंबादास दानवे काय म्हणाले? 

मनसे आणि घ्या दोनशे, पैसे घेऊन महायुतीचा प्रचार येथे सुरु आहेस, म्हणून मी दोनशे रुपये देत आहे., असे म्हणत दानवेंनी मनेसेला डिवचले. तर तुम्हाला तुमची जागा चार जूनला दिसून येईल, असे मनसेने पलटवार केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नेमका वाद काय?

संभाजीनगर येथे ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांच्याविरुद्ध शिंदे गटाकडून संदीपान भुमरे अशी लढत आहे. मनसेकडून भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या महायुतीसाठी सभाही पार पडत आहेत. अशावेळी संभाजीनगरच्या क्रांती चौकात या ठिकाणी उमेदवारांचे कार्यकर्ते आमने-सामने आले.

मनसेचा एकही उमेदवार नाही, अशा स्थितीत महायुतीच्या प्रचारासाठी मनसे मैदानात आहे. म्हणून ठाकरे गट (Shisena) आणि महाविकास आघाडीकडून मनसेला लक्ष्य करण्यात येत आहे. हाच प्रकार आता संभाजीनगरात दिसून आला आहे.

मनसेचे (MNS) कार्यकर्ते पैसे घेऊन महायुतीचा प्रचार आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. त्यामुळेच 'मनसे आणि दोनशे' अशी बोचरी टीका ठाकरे गटाकडून केली गेली उठ दुपारी आणि घे सुपारी, अशाही घोषणा देण्यात आल्या. यालाच प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून 20 रुपयाची नोट ठाकरे गटाला दाखवली गेली. संभाजीनगरच्या क्रांती चौकात दुपारी सव्वा बाराच्या सुमारास राडा पाहायला मिळाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT