MNS Leader Raj Thackeray
MNS Leader Raj Thackeray Sarkarnama
मराठवाडा

MNS : `राजसभे`ला थेट अयोध्येतून अडीच हजार कार्यकर्ते येणार..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी केवळ मराठवाडा, महाराष्ट्रच नाही तर थेट आयोध्येतून देखील राज समर्थक येणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिली आहे. (Raj Thackeray) राज ठाकरेंच्या सभेची पुर्वतयारी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसाठी (MNS) मनसेचे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई व दिलीप धोत्रे हे औरंगाबादेत दाखल झाले आहेत. (Aurangabad)

बैठकांचे सत्र सुरू असून सभेची जय्यत तयारी सुरू आहे. पोलिसांनी अटीशर्तीच्या आधीन राहून मनसेला सभेची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता याची घोषणा कोणत्याही क्षणी करण्याची शक्यता आहे. राजसभेसाठी होणारी गर्दी पाहता पोलिसांनी देखील कडेकोट बंदोबस्त तैनात करण्याची तयारी सुरू केली आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकावर बैठका पोलिस आयुक्तालयात घेतल्या जात आहेत. राज ठाकरे यांनी पुणे येथे औंरगाबाद येथील जाहीर सभेची आणि ५ जून रोजीच्या आयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्या औंरगाबादेतील सभेची उत्सूकता अगदी उत्तर प्रदेश, विशेषतः आयोध्येत देखील असल्याचे समोर आले आहे.

राज ठाकरे यांच्या या सभेसाठी आयोध्येतून अडीच हजार कार्यकर्ते दाखल होणार असल्याचे दिलीप धोत्रे यांनी प्रसार माध्मयांना सांगितले. राजसभा ही रेकाॅर्डब्रेक होणार असून या सभेसाठी आयोध्येतून देखील अडीच हजार कार्यकर्ते येणार आहेत, आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत, असेही त्यांनी सांगितले.

मशिदीवरील भोंग्याचा विषय राज ठाकरे यांनी हाती घेतल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी थेट उत्तर प्रदेशात योगी सरकारने केली. त्याबद्दल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार देखील मानले.

तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारला ते फक्त भोगी असल्याचा टोला देखील लगावला होता. या टीकेनंतर आता थेट आयोध्येतून राज ठाकरेंच्या सभेसाठी अडीच हजार कार्यकर्ते येणार असल्याने राज यांचा करिश्मा आता युपीत देखील पोहचल्याचे पहायला मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT