Pm Modi-Mp Imtiaz Jalil Sarkarnama
मराठवाडा

घरकुल योजनेच्या नावाखाली मोदींनी फसवले ; युपीच्या प्रचारात भांडाफोड करणार

केंद्रीय समितीच्या अध्यक्षांनी घरकुल योजनेतंर्गतचा सविस्तर अहवाल व माहितीसह राज्याच्या सचिवांना ९ फेब्रुवारीला दिल्लीत हजर राहण्याची नोटीस जारी केली आहे. ( Mp Imtiaz Jalil)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करत देशातील गरीबांना घर देण्याची घोषणा केली. (Pm Modi) पंतप्रधान अवास योजनेच्या माध्यमातून दोन कोटी गरीबांना घरे दिल्याचा दावा करत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात केंद्र सरकारची पाठ देखील थोपटली. प्रत्यक्षात मात्र मोदी हे गरीबांना फक्त स्वप्न दाखवतात. (Aimim) घरकुल योजनेच्या नावाखाली त्यांनी गोर-गरिबांची थट्टा चालवली असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Mp Imtiaz Jalil) यांनी पत्रकार परिषदेत केला.

आपल्या मतदारसंघातील ८८ हजार अर्जदारांपैकी फक्त साडेतीनशे लोकांनाच घरकुल मिळाल्याचा दावा करत, उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारात आपण मोदींचा भांडाफोड करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. इम्तियाज जलील यांनी पंतप्रधान घरकुल योजनेतील भोंगळ कारभाराचा दाखला म्हणून आपल्याच मतदारसंघातील आकडेवारी दिली.

इम्तियाज जलील म्हणाले, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या सहा वर्षात ८० हजार ५१८ अर्ज आले असून केवळ ३५५ नागरिकांनाच घरे मिळाली आहेत. ही बाब शहरासाठी लाजिरवाणी असून घरकुल योजनेसंदर्भात केंद्र, राज्य व जिल्हा प्रशासनाची उदासिनता यातून स्पष्ट होते. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सर्वांसाठी घरे २०२२ या संकल्पनेवर आधारित ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये चार घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

यात औरंगाबाद महापालिकेने मोठा गाजावाजा करीत जून २०१६ मध्ये औरंगाबाद शहरातील गोरगरीब नागरिकांची ऑनलाइन पद्धतीने सर्व संबंधित कागदपत्रांसह झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ४५६७ लाभार्थी, क्रेडिट लिंक- १२२५३ लाभार्थी,खाजगी भागीदारी मध्ये परवडणारे गृहनिर्माण म्हणजे फ्लॅट सिस्टीम- ५२८५६ लाभार्थी, स्वत:चे घर बांधकाम-१०८४२ लाभार्थी असे एकूण ८०,५१८ गोरगरीब लाभार्थ्यांचे अर्ज जमा करण्यात आले होते.

यात केवळ स्वत:चे घर बांधकामात ३५५ लाभार्थ्यांना लाभ मिळाला. म्हणजे याचे प्रमाण एक टक्का देखील नाही. घरकुल योजनेंतर्गत औरंगाबाद शहरातील गोरगरीब नागरीकांना आतापर्यंत घरे का देण्यात आली नाही ? याचा जाब विचारण्यासाठी औरंगाबादचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासक यांना पूर्वनियोजित दिल्ली येथील बैठकीत सर्व माहितीसह हजर राहण्याचे आदेश जारी करण्याची विनंती केंद्रीय समितीचे अध्यक्ष व अर्बन डेव्हलपमेंटचे सचिव यांच्याकडे केल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

त्याअनुषंगाने केंद्रीय समितीच्या अध्यक्षांनी घरकुल योजनेतंर्गतचा सविस्तर अहवाल व माहितीसह राज्याच्या सचिवांना ९ फेब्रुवारीला दिल्लीत हजर राहण्याची नोटीस जारी केली असल्याचे सांगतानाच आपण कोणत्याही परिस्थितीत गरीबांना घरे मिळवून देणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT