Sunil Chavan Collector Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

मोदी म्हणाले, शंभर टक्के लसीकरण करा; नागरिकांमध्ये विश्वास वाढवा

(Collector Sunil Chavan Aurangabad)लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या पहिल्या २५ गावांना विशेष निधी देणार आहोत.

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा पर्यटनासाठी प्रसिध्द असल्याने याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमध्ये विश्वास वाढावा, यासाठी पर्यटनाशी संबंधित क्षेत्रातील सर्व व्यक्तींचे मोठ्या प्रमाणावार लसीकरण करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यात विविध उपक्रम राबवुन लवकरच संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करणार असल्याचे पंतप्रधानांना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे अशा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीव्दारे संवाद साधला. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार , इतर राज्याचे मुख्यमंत्री तसेच विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

लसीकरणाविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली `मिशन कवच कुंडल अभियान` राबवून लसीकरण वाढविले आहे. `मन में है विश्वास` हा कोरोना विरूध्दच्या लढाईत मनोबल वाढविणारा उपक्रम आम्ही राबविला. या कार्यक्रमात विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते, आर्मीचा देखील सहभाग होता.

हा कार्यक्रम यापुढेही सुरू राहणार असून त्याची व्याप्ती अधिक वाढविण्यात येईल. लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या पहिल्या २५ गावांना विशेष निधी देणार आहोत. शहरी तसेच ग्रामीण भागासाठी `मेरा वार्ड सौ प्रतिशत टीकाकरण वार्ड`,`संतांची भूमी शंभर टक्के लसीकरण भूमी`, असे वेगवेगळे प्रयोग करून जिल्ह्यात लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT