Theft At MLA Shyamsunder Shinde House News Sarkarnama
मराठवाडा

Theft Of Mla Shyamsunder Shinde News : पंचवीस लाखांची चोरी करून ३० लाखांची खंडणी मागणारा मोरे अखेर सापडला..

Marathwada : या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिस चक्रधर मोरे आणि त्याच्या साथीदाराच्या मागावर होते.

सरकारनामा ब्युरो

Nanded : लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या मुंबई येथील घरात गेल्या महिन्यात झालेल्या चोरीचा मुख्यसूधार व आमदार शिंदे यांच्या गाडीचा चालक चक्रधर मोरे अखेर पोलिसांना सापडला आहे. (Theft Of Mla Shyamsunder Shinde News) नांदेडमधूनच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या महिन्यात १ ते ७ एप्रिल दरम्यान, मोरे याने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने आमदार शिंदे यांच्या मुंबईतील घरातून २५ लाख रुपये रोख पळवले होते.

एवढेच नाही तर ३० लाखांची खंडणी दिली नाही, तर रायगडावर जावून जिवाला इजा करून घेत सोशल मिडियावर बदनामी करण्याची धमकी देखील मोरे याने शिंदे यांना फोनवरुन दिली होती. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली होती. (Shaymsunder Shinde) अखेर महिनाभराने शिंदे यांचा चालक आणि चोरी व खंडणी प्रकरणातील मुख्य सुत्रधार चक्रधर मोरे याचा पोलिसांनी शोध घेत त्याला गुरुवारी नांदेडमधून अटक केली आहे.

आमदार शिंदे यांचा ना. म. जोशी मार्ग येथील अपोलो मिल कम्पाउंडमध्ये असलेल्या लोढा बॅलोसिमो को-ऑप हौ. सोसायटीमधील 39 व्या मजल्यावर फ्लॅट आहे. (Nanded) याच फ्लॅटमधूनन २५ लाखांची रोकड चोरीला गेली होती. ही चोरी त्यांच्याच गाडीवर चालक असलेल्या चक्रधर मोरे याने केली होती. (Marathwada) चोरी केल्यावर मोरे हा नॉट रिचेबल झाला होता.

विशेष म्हणजे काही दिवसांनी शिंदे यांना कॉल करुन मोरेने त्यांच्याकडे ३० लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी एन. एम. जोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिस चक्रधर मोरे आणि त्याच्या साथीदाराच्या मागावर होते. अखेर मोरेला नांदेडमधून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

चालक असल्याने शिंदे यांचा मोरेवर विश्वास होता. घरात त्याचे सातत्याने येणे-जाणे होते. याच विश्वासाचा गैरफायदा उठवत आधी घरातील २५ लाख रुपये चोरले. एवढ्यावर समाधान झाले नाही म्हणून त्याने फोनवरून शिंदे यांच्याकडे ३० लांखाची खंडणी देखील मागितली होती. मोरे आमदार शिंदे यांच्या गावाशेजारील गावातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT