Dhananjay Munde Advice Pankaja : पंकजाताई, कुठं काय बोलावं अन्‌ त्या बोलण्यानं आपलं नुकसान होणार नाही, याची काळजी घे; धनंजय मुंडे यांचा सल्ला

परिस्थिती ज्यावेळी संघर्षाची असते, जो बॅडपॅच असतो, अशा वेळी आपण स्वतःला सांभाळलं पाहिजे.
Dhananjay Munde-Pankaja Munde
Dhananjay Munde-Pankaja MundeSarkarnama

मुंबई : काही झालं तरी भाजप पूर्णपणे बदलेला आहे. त्याचे नेतृत्व बदलेले आहे. नव्याने आलेली ही सर्व मंडळी आहेत. भारतीय जनता पक्ष आज सर्वांना समुद्र वाटतो आहे. पंकजा मुंडे माझी बहीण आहे. पण अशा परिस्थितीमध्ये कुठं काय बोलावं आणि त्या बोलण्यामुळं आपलं नुकसान होणार नाही ना, याचा विचार करून बोललं पाहिजे, असा सल्ला आमदार धनंजय मुंडे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना दिला. (Dhananjay Munde's advice to former minister Pankaja Munde)

दोन दिवसांपूर्वी दिल्लीत अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मी भारतीय जनता पक्षाची आहे. पण भाजप माझा कुठे आहे, असा सवाल केला होता. त्यानंतर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली होती. पंकजा या नाराज आहेत, अशी चर्चाही रंगली होती. त्यावर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे बोलत होते.

Dhananjay Munde-Pankaja Munde
Dhananjay Munde News : मी रात्रभर झोपलो नाही; कारण, गोपीनाथ मुंडेंचे फोटो... : धनंजय मुंडेंकडून आठवणींना उजाळा

ते म्हणाले की, हे खंर आहे की, गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाला भरपूर दिलं आहे. पण, हे देत असताना भाजपला जसं गोपीना मुंडेंनी दिलं, तसं भाजपनंही मुंडेसाहेबांना भरपूर काही दिलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते, युतीचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री, तसेच अनेक राज्यांचे प्रभारी म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली होती.

Dhananjay Munde-Pankaja Munde
Ajitdada Vs Sanjay Raut : धरणात XXXपेक्षा थुंकणं चांगलं; ज्याचं जळतं, त्याला कळतं; संजय राऊतांचा अजितदादांवर पलटवार

संसदेत पहिल्यांदा गेल्यानंतर उपनेते म्हणून त्यांना बढती देण्यात आली होती. तसेच, केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना केंद्रीय ग्रामविकास खात्याचा कार्यभार देण्यात आला होता, असेही मुंडे यांनी नमूद केले.

Dhananjay Munde-Pankaja Munde
BRS Offer to Bhagirath Bhalke : भगीरथ भालकेंना BRSची मोठी ऑफर : पवारांच्या दौऱ्यानंतर आठवडाभरातच राव यांनी साधला संपर्क

धनंजय मुंडे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतरसुद्धा अनेक जबाबदाऱ्या भाजपने पंकजाताईंवर दिल्या. परिस्थिती ज्यावेळी संघर्षाची असते, जो बॅडपॅच असतो, अशा वेळी आपण स्वतःला सांभाळलं पाहिजे. कारण, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेंची संबंध पुण्याई त्यांच्या पाठीशी आहे. ती पुण्याई पाठीशी असल्यामुळे मुंडे साहेबांना मानणारा वर्ग त्यांच्याकडे मुंडेसाहेबांची वारसदार म्हणूनच बघतो आहे. अशा परिस्थितीमध्ये अशा काही गोष्टी बोलणं, मनातील उद्‌विग्नता बाहेर मांडणं, यासाठी ही योग्य वेळ आणि परिस्थिती नाही, असं माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं. हा माझा व्यक्तीगत विचार आहे. आता कोणी काय बोलावं, हा विषय मी ठरवू शकत नाही.

आमच्या कुटुंबात सध्या राजकीय संवाद कसालाही सुरू नाही. आमचा कौटुंबीक पातळीपर्यंतचा संवाद आहे, असेही धनंजय मुंडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com