Eknath Shinde-Babajani Durrani
Eknath Shinde-Babajani Durrani Sarkarnama
मराठवाडा

Babajani Durrani : 'शिंदे गटाचा तो दावा खोटा' : बाबाजानी दुर्राणांनी राष्ट्रवादीसोबतच्या सरपंचांचा आकडाच सांगितला...

सरकारनामा ब्यूरो

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पाथरी (Pathri) तालुक्यातील ४० सरपंचांनी (Sarpanch) शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून केला आहे. मात्र, हा दावा साफ खोटा असून प्रवेश केलेल्यांमधील एकजण वगळता उर्वरीत सर्व सरपंच राष्ट्रवादी कॉंग्रेसशी एकनिष्ठ आहेत, अशी ग्वाही आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांनी रविवारी (ता. २२ जानेवारी) येथे पत्रकार परिषदेत दिली. (Most Sarpanchs in Pathri are with NCP : MLA Babajani Durrani)

परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीची मोठी ताकद आहे. भाजपचे जिह्यात अस्तित्व नाही, त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने शिंदे-फडणवीस सरकार विरोधी पक्षातील माणसे फोडण्याचे काम करीत आहे. ‘तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा, तुमच्या ग्रामपंचायतीला विकासासाठी मोठा निधी देऊ’ असे आश्वासन देत सरपंच मंडळीना फोन करण्यात आल्याचा आरोप आमदार दुर्राणी यांनी केला. पाथरी तालुक्यातील केवळ चार सरपंच शिंदे गटात गेले असून त्यातील केवळ चाटेपिंपळगावचा सरपंच राष्ट्रवादीचा होता, असेही ते म्हणाले.

खासदार डॉ. फौजिया खान म्हणाल्या की, ‘शिंदे-फडणवीस सरकार दडपशाही व प्रलोभन या मार्गांचा वापर करून दुसऱ्या पक्षातील माणसे फोडण्याचे काम करीत आहे. ‘इडी’मध्ये अडकलेले, तुरुंगात राहून जामीनावर सुटलेलेही ते पक्षात घेत आहेत. भावना गवळी यांच्या विरोधातही 'ईडी’ने कारवाई केली होती. त्यामुळे त्यांनी पक्षांतर केले’.

‘जे शिंदे गटात गेलेले नाहीत, त्यांच्या कार्यक्रमाला हजर राहिले नाहीत, अशांची नावे वापरून राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी करण्यात येत आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणी माजी आमदार विजय गव्हाणे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT