Hemant Patil News  Sarkarnama
मराठवाडा

Hemant Patil News : अटकेच्या भीतीने हेमंत पाटलांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र; 'मला अटक करायची असेल, तर...'

Hemant Patil News : "पोलिसांना मला अटक करायची असेल, तर तुम्ही खुशाल करा, मी अटकेसाठी तयार आहे,"

Mangesh Mahale

Hemant Patil News : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाचे डीन शामराव वाकोडे यांना रुग्णालयातील शौचालय साफ करायला लावल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हेमंत पाटील यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अटकेच्या भीतीने त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे.

हेमंत पाटील यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात हेमंत पाटील यांना अटक करण्यासाठी डॉक्टरांच्या विविध संघटनांसह सामाजिक संघटनांनी मोर्चे व निदर्शने सुरू केली आहेत. माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

'स्वच्छ भारत अभियानांतर्गत मी स्वच्छता करायला लावली. त्यामध्ये मीदेखील सहभाग घेतला. सरकारी कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा आणला नाही," असे पाटील म्हणाले. "पोलिसांना मला अटक करायची असेल, तर तुम्ही खुशाल करा, मी अटकेसाठी तयार आहे," असे पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले.

शासकीय रुग्णालयाच्या डीनला शौचालय साफ करायला लावून अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी हेमंत पाटलांसह 10 ते 15 जणांविरोधात ॲट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत पाटील यांनी जाहीर माफी मागावी, या मागणीवर मार्डचे पदाधिकारी ठाम आहेत. पाटील यांच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी केंद्रीय मार्डने काल (गुरुवारी) आंदोलन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT