NCP symbols Hearing : राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह कुणाचे? सुनावणीपूर्वी जयंत पाटलांचे विठ्ठलाला साकडे; "विठ्ठला, निवडणूक आयोगाला योग्य अशी बुद्धी दे..."

Election Commission News : शरद पवार गटाने या प्रकरणी जवळपास 9 हजार शपथपत्र दाखल केल्याची माहिती आहे.
NCP symbols Hearing
NCP symbols Hearing Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह कुणाचे यावर निवडणूक आयोगात आज सुनावणी होत आहे. या सुनावणीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विठ्ठलाला साकडे घातले आहे.

आता विठ्ठलाची परीक्षा

"देशात पक्षाच्या चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. एका पक्षाची चोरी झाली दुसऱ्या पक्षाची चोरी होणार नाही, यासाठी आता विठ्ठलाची परीक्षा आहे," असे सांगत जयंत पाटलांनी 'विठ्ठला, निवडणूक आयोगाला योग्य अशी बुद्धी दे," असे साकडे घातले. पंढरपूर येथे त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादीत फूट पडून दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांतील सत्तासंघर्षावर आज निवडणूक आयोगात दुपारी महत्त्वपूर्ण सुनावणी होत आहे. सुनावणीत राष्ट्रवादी पक्ष व निवडणूक चिन्ह कुणाचे? यावर ठोस निर्णय आयोग घेण्याची शक्यता आहे. यासाठी दोन्ही गटांच्या वकिलांनी जोरदार तयारी केली आहे.

NCP symbols Hearing
Thackeray Group News : यमाच्या रेड्यावर मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री बसून मौजा मारीत आहेत; ठाकरे गटाची चौफेर टीका

पवार गटाने या प्रकरणी जवळपास 9 हजार शपथपत्र दाखल केल्याची माहिती आहे. हा आकडा अजित पवार गटाहून जास्त असल्याचा दावा जयंत पाटलांनी केला आहे. पण अजितदादांच्या गटात लोकनियुक्त लोकप्रतिनिधींचा आकडा जास्त असल्यामुळे ते पवारांवर वरचढ ठरण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दोन्ही गट निवडणूक आयोगात आपली बाजू मांडणार आहेत.

"पक्षातील बहुसंख्य लोक शरद पवार यांना पाठिंबा देत आहेत. शिवसेना आणि आमचे प्रकरण यात फरक आहे. २७ राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. बहुसंख्य पदाधिकारी सगळे शरद पवार यांच्या सोबत आहेत. अजित पवार यांनीच सांगितले होते, मनसेचा एक आमदार गेला म्हणजे पक्ष त्यांचा झाला असे होत नाही. चुकीचा निर्णय झाला तर न्यायालयात जावे लागेल. पण तसे होणार नाही," असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला.

NCP symbols Hearing
Manoj Jarange News : खुर्ची गेली तरी मुख्यमंत्री मागेपुढे पाहणार नाहीत, आरक्षण देतीलच; जरांगेंना ठाम विश्वास

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com