Mp Hemant Patil News Sarkarnama
मराठवाडा

Hemant Patil News : खासदारकीचा राजीनामा दिला अन् हेमंत पाटील दिल्लीत उपोषणाला बसले

Shivsena News : मी मौनव्रत धारण करून हे उपोषण करत असल्याचे हेमंत पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

राजेश दारव्‍हेकर

Marathwada Political News : शिवसेना शिंदे गटाचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी नुकताच आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सोपवला. (Maratha Reservation) त्यानंतर दिल्लीतील महाराष्ट्र सदन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आज (दि.३१) पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण सुरू केले. मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. राज्यात व मराठवाड्यात विविध ठिकाणी हिंसक आंदोलन सुरू झाले आहे.

लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्यात आली आहे. (Shivsena) या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांना घेराव घालत संतप्त मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर पाटील (Hemant Patil) यांनी राजीनामा देत ते पत्र काल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्त केले. मराठा आरक्षणासाठी दिल्लीत उपोषण करण्याचे पाटील यांनी जाहीर केले होते, त्यानुसार आज सकाळी त्यांनी महाराष्ट्र सदनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

उपोषणाला बसण्यापूर्वी खासदार पाटील यांनी हस्तलिखित एक प्रसिद्धी पत्र काढून आपण मौनव्रत धारण करून लाक्षणिक उपोषण सुरू करत असल्याचे कळविले आहे. आज, मी मराठा समाजास आरक्षण मिळावे तसेच इतर प्रश्न देशाच्या राजधानीत गांभीर्याने घ्यावेत, यासाठी लाक्षणीक उपोषणास बसत आहे. मी महाराष्ट्रातील मराठवाडा (Marathwada) भागातील हिंगोली भागाचे प्रतिनिधित्व करतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या भागातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात शेती करणारा असून, नापिकी, वातावरणातील बदल, शेतीमालाला मिळणारा अल्प दर यामुळे मोठ्या प्रमाणात तो आत्महत्या करतो आहे. मराठा समाज अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये हालाखीचे जीवन जगत आहे. बेरोजगारीमुळे गावागावांत शेकडो तरुण वैफल्यग्रस्त जीवन जगत असून, अनेकजणांचे लग्नही होत नाहीत. त्यामुळे या नैराश्यातूनही ते आत्महत्या करत आहेत. मागील ७ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील अन्न-पाणी त्यागून उपोषणास बसले असून, त्यांच्या समर्थनार्थ गावागावांतून शेकडो युवक, महिला उपोषण करत त्यांना साथ देत आहेत.

या प्रश्नाचे गांभीर्य लोकसभेच्या व्यासपीठावर मांडणे माझे कर्तव्य असून, यापूर्वी हा प्रश्न मी लोकसभेत अनेकदा उपस्थित केला आहे. या प्रश्नावर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय २३ खासदारांची बैठकही घेतली. या प्रश्नाचे गांभीर्य दिल्लीच्या व्यासपीठावर जाणवावे, यासाठी मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे माझा राजीनामा दिला आहे. यावर अनेक प्रस्थापीत नेते टीका करत असून, वाद-प्रतिवाद करून या प्रश्नाचे गांभीर्य मी घालवू इच्छित नाही. म्हणून मी मौनव्रत धारण करून हे उपोषण करत असल्याचे हेमंत पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दिल्लीतील त्यांच्या या लाक्षणिक उपोषणास राजकीय व इतर स्तरातून पाठिंबा वाढताना दिसून येत आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT