Osmanabad Politics:  Sarkarnama
मराठवाडा

MP Om Rajenimbalkar News: खासदार ओम राजेनिंबाळकरांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी: नेमकं काय म्हणाले?

Osmanabad Politics: उस्मानाबाद (धाराशिव) जिल्हा परिषदेच्या कार्यलयात शुक्रवारी (२ जून) प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांच्या संदर्भात आढावा बैठक पार पडली.

सरकारनामा ब्यूरो

MP Om Rajenimbalkar News: उस्मानाबाद (धाराशिव) जिल्हा परिषदेच्या कार्यलयात शुक्रवारी (२ जून) प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांच्या संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी आमदार कैलास पाटील हे देखील उपस्थित होते. (MP Om Rajenimbalkar scolds officials: What exactly did he say?)

पण या बैठकीत धाराशिव जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या प्रश्नावर खासदार ओमराजे निंबाळकर (OM Raje Nimabalkar) चांगलेच आक्रमक झालेले दिसले. जिल्हा परिषदेत काही महिन्यांपासून शिक्षकांच्या रिक्त जागा रिक्त होत्या. या रिक्त जागा का भरल्या गेल्या नाहीत, यावरुन ओम राजे निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना चांगलंच फटकारलं.

सीईओला विचारलं ते म्हणाले, अधिकारीच फायली पाठवत नाहीत. जर शिक्षण अधिकारीच सीईओ साहेबांचं ऐकत नसतील तर कस होणार. जर तुम्ही आयएएस अधिकारी असूनही कर्माचाऱ्यांवर कारवाई करु शकत नाहीत तर प्रशिक्षणात काय शिकलात, खालचे अधिकारी तुमचं ऐकत नसतील तर तुम्ही काय करताय. शेवटी मी शिक्षण अधिकारी आणि आयएएस अधिकाऱ्यांनाच बोलणार. (Osmanabad News)

शिक्षकांच्या रिक्त झालेल्या जागा भरा यासाठी आम्ही स्वत:मागे लागलो असताना तुम्ही का या जागा भरल्या नाहीत, सीईओंनी फाईल क्लिअर करुन दिली आणि एक क्लर्क थेट जीआर'च मागतोय कोण आहे तो. सीईओंनी फाईल क्लिअर करुन दिल्यानंतर या रिक्त जागा भरायला तुम्हाला काय हरकत होती. मतासाठी आम्हाला लोकांकडे जावं लागतं पण जर त्यांची कामचं झाली नाहीत तर लोक आम्हाला घरी बसवतील, माझा अंत पाहू नका, १० तारखेच्या आत जर हा विषय क्लिअर झाला नाही तर मला निर्णय घ्यावा लागेल, असा थेट इशाराच ओम राजेनिंबाळकर यांनी दिला. (Om Rajenimbalkar Latest news)

Edited By- Anuradha Dhawde

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT