Mp Omraje Nimbalkar News  Sarkarnama
मराठवाडा

Mp Omraje Nimbalkar News : ठाकरेंच्या खासदाराने पंतप्रधान मोदींनाही मागे टाकले...

सरकारनामा ब्युरो

Shivsena : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अख्ख्या जगात दबदबा असल्याचा दावा भाजपकडून सातत्याने केला जातो. (Mp Omraje Nimbalkar News ) मोदींच्या नऊ वर्षाच्या सत्ताकाळात जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा उंचावली, प्रगत राष्ट्र भारताला मान देत आहेत, आपले मत गांभीर्याने विचारात घेत आहेत, असेही सांगितले जाते. तर दुसरीकडे विरोधक मात्र भाजपचा हा दावा फोल असल्याची टीका करत आहेत.

मोदींचा जागतिक पातळीवरचा करिष्मा हा वादाचा विषय असला तरी मराठवाड्यातील ठाकरे गटाच्या एका खासदाराने मात्र (PM Modi) मोदींना मागे टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. ते खासदार म्हणजे धाराशीव लोकसभा मतदारसंघाचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर. (Omraje Nimbalkar) दोन आठवड्यापुर्वी जागतिक योगादिन साजरा करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा अमेरिका दौऱ्यावर होते आणि त्यांनी तिथे योगादिन साजरा केला. समाज माध्यमांवर मोदींच्या योगाचे स्वागत आणि कौतुकही झाले. (Shivsena) त्याला लाखो लोकांची पंसती मिळाली, याचे व्हिडिओ जगभरातील विविध माध्यमांवरून दाखवले गेले. पण एका प्लॅटफाॅर्मवर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे पंतप्रधान मोदींनाही भारी ठरल्याचे समोर आले आहे.

ओमराजे हे आपल्या पिळदार शरीरयष्टी आणि नियमित व्यायाम, योगासाठी ओळखले जातात. स्वतःच्या फेसबुकपेजवर ते नियमित व्यायामासाठी घेत असलेली मेहनत, घोडेस्वारी आणि योगाचे व्हिडिओ शेअर करत असतात. जागतिक योगादिनी त्यांनी केलेल्या योगाच्या विविध प्रकारांचे व्हिडिओ त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केले होते. तर त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील न्यू याॅर्क सिटीतील योगाचे व्हिडिओ देखील फेसबुकवर व्हायरल करण्यात आले होते.

जागतिक योगदिन साजरा होवून दोन आठवडे उलटल्यानंतर मोदी आणि ओमराजे यांच्या व्हिडिओला कसा प्रतिसाद मिळाला याची आकडेवारी समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिकेतील योगदिनाला २.४ मिलियन (२४ लाख ) प्रेक्षक लाभले. तर याच कालावधीत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या योगदिनाच्या व्हिडिओला तब्बल २.७ मिलियन (२७ लाख) प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. मोदींचा योगदिनाचा व्हिडिओ १९ लाख ३ हजार लोकांनी पाहिला, तर ओमराजे यांचा १६ लाख एक हजार लोकांनी. फेसबुकवर ही आकडे समोर आल्यानंतर आता मोदी आणि ओमराजे यांच्या लोकप्रियतेची तुलना होवू लागली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT