AIMIM On CM News : राजकारणाची स्थिती पाहता मी पण मुख्यमंत्री होवू शकतो..

Marathwada : आम्हाला भाजपची बी टीम म्हणून हिणवत होते. पण आज सत्तेसाठी हेच पक्ष भाजपच्या मांडीवर जावून बसले
AIMIM News, Marathwada
AIMIM News, MarathwadaSarkarnama
Published on
Updated on

MP Imtiaz Jalil : राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. कालपर्यंत जे आम्हाला भाजपची बी टीम म्हणून हिणवत होते, तेच आता भाजपच्या मांडीवर जावून बसले आहेत. (AIMIM On CM News) हा सगळा प्रकार पाहता उद्या मी देखील मुख्यमंत्री होवू शकतो, असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला आहे.

AIMIM News, Marathwada
Thackeray Group People will go to Shinde Group : ठाकरे गटाला अजून एक धक्का, पाहा सविस्तर

शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. (AIMIM) प्रसार माध्यमांशी बोलतांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या शिंदे गटातील प्रवेशावरही त्यांनी भाष्य केले.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काहीही अशक्य नाही, इथे कोणीही कोणत्या पक्षात जावू शकते.विचारधारा, तत्व, धोरणं सगळी बासनात गुंडाळून ठेवण्यात आली आहेत. (Marathwada) त्यामुळे उद्या मी मुख्यमंत्री झालो तरी आश्चर्य वाटायला नको, असा चिमटा इम्तियाज (Imtiaz Jalil) यांनी काढला.

राष्ट्रवादी, शिवसेना कायम आम्हाला भाजपची बी टीम म्हणून हिणवत होते. पण आज सत्तेसाठी हेच पक्ष भाजपच्या मांडीवर जावून बसले आहेत. नीलम गोऱ्हे यांचे पुण्यातील एक संभाषण व्हायरल झाले होते. ज्यात त्यांची चिथावणीखोर आणि बस जाळण्याची भाषा केली होती.

आम्ही ओरड केली, पुरावे दिले पण पोलिसांनी त्यांच्यावर तेव्हा कुठलीच कारवाई केली नाही. त्याच नीलम गोऱ्हे आज सत्ताधारी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झाल्या आहेत. राजकारणाने इतकी गलीच्छ पातळी गाठली आहे, की इथे काहीही अशक्य नाही, याचा पुनरुच्चार देखील इम्तियाज जलील यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com