Dharashiv : राज्यात सत्तेसाठी हपापलेले पक्ष आणि त्यांचे नेते, आमदार, खासदार एकीकडे आणि दुसरीकडे संकटातही एकनिष्ठ राहून आपल्या नेत्यांला खंबीर साथ देणारे. मला अभिमान आहे, मी माझ्या नेत्याला दगा देणाऱ्यांपैकी नाही. (Mp Omraje Nimbalkar News) माझे पहिले गुरु माझे वडील, ज्यांच्या शिकवणीवर मी वाटचाल करतोय, दुसरे गुरु स्व. बाळासाहेब ठाकरे आणि तिसरे म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.
ज्यांनी माझ्यावर मुलासारखे प्रेम आणि माया केली. (Osmanabad) मी सुद्धा माझी निष्ठा त्यांच्या चरणी अर्पण केली, अशा भावना धाराशीवचे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी व्यक्त केल्या. काल देशभरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वांनी आपल्या गुरुंप्रति आदरभाव व्यक्त करत त्यांना नमन केले. राजकारणात देखील असे अनेक दिशा दाखवणारे गुरू लाभले आहेत.
धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. (SHIVSENA) गुरू म्हणजे आपल्यासाठी काय योग्य आहे हे समजविणारा व त्यासाठी योग्य मार्ग दाखविणारा मार्गदर्शक. स्व.राजेसाहेब हे माझे पहिले गुरू त्यांनी कायमच समाजाचे आपण देणे लागतो व त्या अनुषंगाने आपण कार्य केले पाहिजे हे सांगितले. मी माझ्या कृतीतून त्यांनी दाखविलेल्या मार्गावर मार्गक्रमण करत आहे.
आजही लोक मला त्यांचा मुलगा म्हणून प्रथम व नंतर खासदार म्हणून ओळखतात ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझे दुसरे गुरू म्हणजे मा.बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्रला लाभलेले तेजस्वी व्यक्तिमत्त्व. मी खुप नशिबवान आहे की मला त्यांचा सहवास लाभला. बाळासाहेब म्हणजे माझ्यासारख्या लाखो लोकांचे श्रद्धास्थान. त्यांनी माझ्या जीवनाचे सोने केले व जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला.
तिसरे गुरू म्हणजे उद्धव साहेब, त्यांनी कायमच मला मुलासारखे प्रेम व माया दिली व मीसुद्धा माझी निष्ठा त्यांच्या चरणी अर्पण केली. जीवनात चढ उतार हे कायमच असतात अशावेळी गुरू बदलणाऱ्या पैकी मी नव्हे. उद्धवजी म्हणजे माणुसकी असलेले आदर्श व्यक्तिमत्त्व. माझ्या जीवनात कधीही तत्वांशी तडजोड करणार नाही हीच माझी माझ्या गुरूंना गुरुदक्षिणा असल्याचे ओमराजे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.