Sanjay Raut  Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Raut News: 40 आमदारांना 50 कोटींचा शिधा अन् गरिबांना एक किलोचा; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

MahaPrabodhan Yatra : मोदी पुन्हा प्रकटले आणि दोन हजारांच्या नोटबंदीची घोषणा झाली; संजय राऊतांची टीका

सरकारनामा ब्यूरो

Beed News: ठाकरे गटाची आज बीडमध्ये महाप्रबोधन यात्रेची समारोप सभा पार पडली. यावेळी खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. याबरोबरच दोन हजार रुपयांच्या नोटबंदीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

तसेच शिंदेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, असंही राऊतांनी म्हटलं. संजय राऊत यांचे आज बीडमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी महाप्रबोधन यात्रेच्या सभेत ते बोलत होते.

राऊत म्हणाले, "ज्यावेळी महाप्रबोधन यात्रेची सुरवात झाली होती. त्यावेळी मी तुरुंगात होतो. ही महाप्रबोधन यात्रा एका वाघीनीने सुरू केली होती. आज ती पूर्ण होत आहे. आताचं सरकार आनंदाचा शिधा देतंय, आनंदाचा शिधा काय भिक देता का? त्या 40 आमदारांना पन्नास कोटींची शिधा देता. आमच्या गोरगरीब जनतेला एक किलो साखर आणि एक किलो चनादाळ देता", असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

"उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या मुद्यांवर राजीनामा दिला. पण त्यांनी राजीनामा दिला नसता तर ते आज मुख्यमंत्री असते, असं कोर्टाने सांगितलं आहे. कोर्टाने सध्याचं सरकार बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे शिंदेंना आणि त्यांच्या आमदारांना थोडी लाज वाटत असेल तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा", असं राऊत म्हणाले.

"मोदी पुन्हा प्रकटले आणि दोन हजारांच्या नोटबंदीची घोषणा झाली. गरिबांकडे पाचशे रुपये नाहीत. तुमचे मंत्री, आमदार व शेठजींकडे दोन हजारांच्या नोटांचे बंडल आहेत", असं म्हणत दोन हजारांच्या नोटबंदीवरुन राऊतांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

"कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 36 सभा घेऊन देखील पराभव झाला. बाळासाहेब ठाकरे एक हजार मोदींना भारी आहेत. आगामी निवडणुकीत आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावणार आहोत, तुम्ही मोदी-शाहांचे फोटो लावून निवडणूक जिंकून दाखवा", असं आव्हान संजय राऊतांनी भाजपला दिलं.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT