Sushma andhare News: गोपीनाथ मुंडे होते तेव्हा भाजपमध्ये नैतिकता होती, पण आता...; बीडमध्ये सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

MahaPrabodhan Yatra : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्हिडिओ दाखवत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
Sushma andhare
Sushma andhareSarkarnama
Published on
Updated on

Beed News: ठाकरे गटाची आज बीडमध्ये महाप्रबोधन यात्रेची समारोप सभा पार पडली. यावेळी शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जुने व्हिडिओ दाखवत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

सुषमा अंधारे म्हणाल्या, "गोपीनाथ मुंडे होते तेव्हा भाजपमध्ये नैतिकता होती. मात्र, आता भाजपमध्ये नैतिकता राहिली नाही. भाजपने संग्राम मेटे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांचा वापर करत बाजूला केलं. आता आमचे 40 आमदार भाऊ तिकडे गेले आहेत. त्यांचाही भाजप वापर करत आहे. आमचे 40 भाऊ हे भाजपच्या कळसुत्री बाहुल्यांच्या खेळात अडकले आहेत", असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली.

Sushma andhare
Ajit Pawar : अजित पवारांनी काढला सतेज पाटलांना चिमटा; म्हणाले "बंटीला आता बंटी झाले तरी..."

"भाजपने संग्राम मेटे यांचा वापर करुन घेतला. मात्र आता त्यांच्या शिवसंग्राम सेनेच्या पदाधिकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. भाजपची ही नेहमीची नीती आहे. महादेव जानकर यांचाही वापर करुन घेतला. सदाभाऊ खोत कुठे आहेत?" असंही त्या म्हणाल्या. तर "मला अजूनही भाजपसोबत गेलेल्या त्या भावंडाबबात वाटतं की घरातील लेक म्हणून सर्वांना साभांळून घ्यावं, मग ते कितीही चुकार असले तरी", असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

Sushma andhare
Delhi News: प्रशासकीय अधिकाऱ्यांवरून दिल्लीत राजकारण पेटले; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केंद्राने अध्यादेशच काढला

"महाप्रबोधन यात्रेत आम्ही कोणावर देखील टीका करायला जात नाहीत. तर आम्ही फक्त त्यांना प्रश्न विचारतो. भाजपने जात आणि धर्माच्या दंगली सुरु केल्या आहेत", असा गंभीर आरोप यावेळी सुषमा अंधारे यांनी केला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com