Aurangabad News, Abdul Sattar  sarkarnama
मराठवाडा

भाषण सुरु असतानाच सत्तारांच्या सभेतून लोक निघाले...

Aurangabad News : वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळी आहे.

सरकारनामा ब्यूरो

Aurangabad News : बाळासाहेबांची शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे नेते राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तार यांच्या विरोधात राण उठवले आहे.

अशातच सत्तारांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहील, असा दावा सत्तारांनी केला होता. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी गर्दी जमल्याने सत्तारांच्या दाव्यातली हवाच निघाली. चालू भाषणातच खुर्च्या उचलण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली.

सत्तारांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी शिवराळ भाषेत वक्तव्य केल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाह्यला मिळाले. कारण या सभेला सत्तारांच्या अपेक्षेपेक्षा कमी गर्दी झाली. मैदान भरले नाही म्हणून चालू भाषणातच खुर्च्या उचलण्याची वेळ आली. रिकाम्या खुर्च्या कोणाच्या नजरेत भरु नये, यासाठी भाषणे सुरु असतानाच खुर्च्या उचलून बाजूला ठेवण्यात आल्या.

दरम्यान, चालू सभेतून लोक जात असताना मंत्री सत्तार यांनी मंचावरुनच आदेश दिले, की सभा संपेपर्यंत कुणीही जाऊ नये, याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. दुसरीकडे आजचा दिवस सत्तारांनी गाजवला. त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे, राज्यभरात एकच संतापाची लाट उसळी. यावर सत्तारांनी औरंगाबादच्या सभेत दिलगीरी व्यक्त केली आहे. मात्र, राष्ट्रवादीने सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT