मुख्यमंत्री शिंदेंचा सत्तारांना जाहीर सभेत माफी मागण्याचा आदेश?

Abdul Sattar : राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे.
Eknath Shinde-Abdul Sattar Latest News
Eknath Shinde-Abdul Sattar Latest NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

औरंगाबाद : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. सिल्लोड येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अभद्र भाषा वापरली. यावरून राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. (Eknath Shinde-Abdul Sattar Latest News)

Eknath Shinde-Abdul Sattar Latest News
मुख्यमंत्री शिंदेंचा मंत्री-आमदारांवरील कंट्रोल सुटतोय?; 'या' वक्तव्यावरून झाली आतापर्यंत गोची...

दरम्यान, हे प्रकरण आणखी चिघळण्याआधीच मंत्री सत्तारांनी सिल्लोडला होणाऱ्या सभेत त्यांनी जाहीर माफी मागावी,असा आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री सत्तारांना दिल्याचे समजते. काही वेळातच खासदार श्रीकांत शिंदे यांची सभा होणार आहे. या सभेत सत्तार (Abdul Sattar) माफी मागून या वादावर पडदा टाकतील, असे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com