Mp Sudhakar Shringare News, Latur Sarkarnama
मराठवाडा

Mp Sudhakr Shringare News : विलासराव देशमुख गेल्यानंतर लातूरची प्रगती खुंटली..

Marathwada : विलासराव हे खिलाडू वृत्तीचे होते. मी देखील एक खेळाडूच आहे.

सरकारनामा ब्युरो

Latur : लातूर हे राज्यातील शिक्षणाचे हब म्हणून ओळखले जाते. कोटानंतर जर कुठल्या शहाराचे नाव घेतले जात असले तर ते लातूरचे. दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या हयातीत जिल्ह्याची प्रगती वेगाने होत होती. अनेक उद्योग इथे आले, जमीनीचे भाव आकाशाला भिडले होते, लातूर पॅटर्नची देशात चर्चा होती. पण विलासराव देशमुखांच्या निधनानंतर या जिल्ह्याची प्रगती खुंटली, अशी कबुली भाजपचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू, असे आवाहन देखील त्यांनी उपस्थितीत आमदार अमित देशमुख, (Amit Deshmukh) अभिमन्यू पवार यांना केले. श्रृंगारे यांनी आपल्या भाषणात विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. (Latur)

ते म्हणाले मुंबई मी अनेक कामे केली, एमसीएचे स्टेडिअम हे त्यापैकीच एक. अशी मुंबईत आणि राज्यात अनेक कामे मी केली, विलासराव देशमुखांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करता आले. अशा अनेक उद्घाटन कार्यक्रमात ते फित कापायचे मी त्यांना कात्री द्यायचो. पण मी लातूरचा आहे हे सांगण्याची कधी हिमंत झाली नाही. दिलीप वेंगसरकर यांचा पराभव करून ते एमसीएच्या निवडणुकीत विजयी झाले होते.

विलासराव हे खिलाडू वृत्तीचे होते. मी देखील एक खेळाडूच आहे. कब्बडी, खो खो, कुस्ती, व्हाॅलीबाॅल हे सगळे खेळ मी खेळलेलो आहे. त्यामुळे जिल्ह्याचा खासदार म्हणून माझ्याकडून खेळा प्रोत्साहन देण्यासाठी जे काही लागेल ते मी करायला तयार आहे. लातूरच्या विभागीय क्रिडासंकुलाच्या रखडलेल्या कामाला देखील आपण पुन्हा गती देण्याचा प्रयत्न करू. अमित देशमुखांचे अभिमन्यू पवारांवर प्रेम आहे. पण तसेच प्रेम त्यांनी माझ्यावरही करावे, मला त्यांच्या मदतीची गरज आहे, असेही श्रृंगारे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT