Marathwada : राष्ट्रवादीचे ठाण्यातील नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काल ठाणे महापालिकेतील अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.
जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्यासंबंधी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या (Ncp) कार्यकर्त्यांनी आहेर यांना मारहाण केली. (Dhnanjay Munde) यानंतर आता संबंधितांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे.
त्यांनी ट्विट करत राज्य सरकारमधील अधिकारी गुंडाच्या टोळ्या चालवत आहेत का? असा सवाल केला आहे. मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यातील सरकारी अधिकारी काय गुंडाच्या टोळ्या चालवत आहेत का ? आमचे बंधू आव्हाड यांच्या परिवाराला संपवण्याच्या धक्कादायक ऑडिओ क्लिप फिरत आहेत.
अशा अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करून त्यावर कडक कारवाई करावी. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या संपूर्ण परिवाराला सुरक्षा देण्यात यावी. या अधिकाऱ्याच्या टोळीत अजून कोण कोण आहेत याचा पर्दाफाश गृहखात्याने करावा. व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
आव्हाड यांची मुलगी नताशा आणि जावई यांचा स्पेनमधील पत्ता शोधला असल्याचा ऑडिओमध्ये उल्लेख आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय वातवरण पेटलेले असतांना मुंडे आव्हाडांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.