Dhnanjay Munde-Pankaja Munde News, Beed Sarkarnama
मराठवाडा

Munde : आमची बहिण मंत्री होती, पण त्यांना परळीला एमआयडीसी आणता आली नाही..

प्रकाशदादा सोळुंके हे साधे राज्यमंत्री होते, तरी त्यांनी माजलगांवला एमआयडीसी आणली. (Dhnanjay Munde)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : माजीमंत्री आमदार धनंजय मुंडे यांचे काल माजलगांवच्या मेळाव्यात झालेले भाषण चांगलेच चर्चेत आले आहे. या भाषणातून त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर तोंडसुख तर घेतलेच पण आपल्या भगिनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावरही निशाणा साधला.

फडणवीस सरकारमध्ये आमच्या भगिणी मंत्री होत्या, पण त्यांना परळीत एमआयडीसी आणता आली नाही. प्रकाशदादा सोळुंके (Prakash Solunke) राज्यमंत्री होते, तरी त्यांनी माजलगांवला एमआयडीसी आणली, असा टोला मुंडे (Dhnanjay Munde) यांनी लगावला.

धनंजय मुंडे सध्या भाजप आणि शिंदे सरकारवर चांगलेच तुटून पडले आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनात सभागृहातील भाषणातून मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढले होते.

विशेषतः १२० आमदार असतांना फडणवीस यांनी संवैधानिक नसलेले उपमुख्यमंत्री पद का स्वीकारले? असा सवाल करत त्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. काल माजलगाव येथे झालेल्या मेळाव्यात देखील हाच मुद्दा त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत केला होता.

मुंडे यांचे कालचे भाषण चांगलेच लक्षवेधी ठरले होते. या भाषणात त्यांनी आपल्या भगिणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यावर देखील टीका करण्याची संधी सोडली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण जिल्ह्याचा कसा विकास केला? प्रकाशदादा सोळुंके हे साधे राज्यमंत्री होते, तरी त्यांनी माजलगांवला एमआयडीसी आणली.

पण आमच्या भगिणी कॅबिनेट मंत्री, जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या, तरी देखील त्यांना परळीला एमआयडीसी आणता आली नाही, असा टोला लगावला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळीत धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाल्यापासून या दोघांमध्ये राजकीय कुरघोडी सुरू आहे.

संधी मिळेल तेव्हा मुंडे भगिणी आणि धनंजय मुंडे हे देखील एकमेकांवर टीका करतात. माजलगाव येथील मेळाव्याच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा पंकजा यांच्यावर टीकेची संधी हेरली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT